Angarki Sankashti Chaturthi 2021: अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा द्या, गणपतीला वंदन करा, असं करा व्रत
या दिवशी गणपतीच्या मंत्रांचा जप करावा, पूर्ण दिवसभर उपवास ठेवावा. चंद्रोदयानंतर सोडावा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appव्रत कथा सांगा किंवा ऐका. चंद्राला अर्घ्य अर्पण करा.
गणपतीला तीळ, गूळ, लाडू, दुर्वा, चंदन अर्पण करा. वंदन करा.संध्याकाळी चंद्र उगवण्यापूर्वी गणपतीचे पूजन करा.
संकष्टी चतुर्थी दिवशी सकाळी उठल्यानंतर आधी आंघोळ करा आणि स्वच्छ धुतलेले कपडे घाला. सकाळी गणपतीची पूजा करा.
या दिवशी गणपतीची पूजा केली जाते, यामुळे घरात प्रसन्न वातावरण बनतं. हिंदू पंचांगानुसार संकष्टी चतुर्थीचा व्रत कृष्ण पक्ष चतुर्थीला ठेवला जातो. पूर्ण वर्षात संकष्टी चतुर्थीचे 13 व्रत ठेवले जातात.
भाविकही अगदी भक्तीभावाने गणेशाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात. संकष्टी चतुर्थी हा दिवस लाडक्या गणपतीला समर्पित केलेला आहे.
आज या वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी आहे. आज चंद्रोदय 9.16 मिनिटांनी होणार आहे. संकष्टीचा अर्थ दुः खाचा पराभव करणारा असा होतो.
या दिवशी मंदिरांमध्ये गर्दी असते मात्र आज कोरोनामुळं ही गर्दी तुलनेनं कमी पाहायला मिळणार आहे.
अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते, अशी भावना आहे.
गणेश भक्तांसाठी अतिशय महत्वाची असणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आज आहे. ही 2021 या नव्या वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -