एक्स्प्लोर
Advertisement
आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या जत्रेला सुरुवात
कोकणातील लाखो भक्तांचे श्रद्धा स्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गातील आंगणेवाडीच्या जत्रेला प्रारंभ झाला आहे. दरवर्षी या जत्रेला राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात.
सिंधुदुर्ग : कोकणातील लाखो भक्तांचे श्रद्धा स्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गातील आंगणेवाडीच्या जत्रेला प्रारंभ झाला आहे. दरवर्षी या जत्रेला राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात.
आंगणे कुटुंबियांचे खाजगी मंदिर असलेल्या, मात्र लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या भराडीदेवीच्या जत्रेसाठी कोकणी माणूस घरापासून किती लांब असला तरी तळ कोकणात परततो. मग लाखोंच्या संख्येने आलेल्या कोकणी माणसाच्या उपस्थितीत आंगणेवाडीची जत्रा संपन्न होते.
यावर्षी दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांना दर्शन सुलभ व्हावे या करिता मंदिराच्या दिशेने येणारे दहा मार्ग करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षाचे नेते या जत्रेला आवर्जून हजेरी लावतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement