एक्स्प्लोर

…अशी ठरते आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख!

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री भराडीदेवीचं मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. मालवणपासून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर एका माळरानावर श्री भराडी देवीची यात्रा भरते. ही यात्रा दोन दिवस चालते. कालपासून या यात्रेला सुरुवात झाली आहे. कोकणात प्रामुख्याने मार्लेश्वर, कुणकेश्वर आणि आंगणेवाडी या तीन जत्रा अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यातही गेल्या काही वर्षांत मुंबईतून आंगणेवाडीच्या जत्रेला येणाऱ्या चाकरमान्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पूर्वी जत्रेला येण्यासाठी एसटीशिवाय पर्याय नव्हता. मात्र आता कोकण रेल्वेबरोबरच खाजगी वाहनांचीही साथ मिळू लागल्याने दरवर्षी आंगणेवाडीची जत्रा गर्दीचे विक्रम मोडत आहे. आंगणेवाडी ही खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे या गावाची एक वाडी. म्हणजे एका अर्थाने ही एका वाडीची जत्रा म्हणायला हवी. मात्र, गेल्या पाच-पंचवीस वर्षांत तिला मोठं स्वरूप आलं आहे. अनेकजण मोठ्या श्रद्धेने या जत्रेला येतात. अशी ठरते भराडी देवीच्या जत्रेची तारीख! कोकणात जत्रांची कमतरता नाही. वर्षाच्या ठरावीक तिथीला प्रत्येक गावात जत्रा भरते. मात्र श्री भराडीदेवीच्या जत्रेची तारीख कुठल्या पंचागात अथवा कॅलेंडरमध्ये सापडणार नाही. कारण ती निश्चित नसते. देवीचा कौल मिळाल्यावरच तारीख ठरते. ही तारीख ठरवण्याची प्रथाही उत्सुकतेची आहे. दिवाळीत शेतीची कामं झाली की आंगणेवाडीतील देवीचे मानकरी एका डाळीवर (बांबूपासून बनवलेली चटई) बसतात. यालाच डाळप स्वारी म्हणतात आणि डुकराच्या शिकारीचा (पारध) दिवस ठरवतात. देवीला कौल लावला जातो. गावकरी जंगलात घुसतात आणि डुकराची शिकार वाजतगाजत घेऊनच परततात. त्यानंतर काही दिवसांनी जत्रेचा दिवस ठरवण्यासाठी पुन्हा डाळप स्वारी होते आणि कौल लावून जत्रेचा दिवस निश्चित होतो. सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जत्रेची तारीख. जत्रेची तारीख इतरांना कळवणं हा आगळा अनुभव फक्त या यात्रेतच पहायला मिळतो. एसटीवर, रिक्षावर, सुमोवर,  ग्रामपंचायतीच्या फळ्यावर जिथे जागा मिळेल तिथे प्रत्येक ठिकाणी खडूचा रंग उठतो आणि उमटली जाते ती जत्रेची तारीख. भराडी देवीच्या जत्रेला देश-विदेशातून भाविक आंगणेवाडी ही मालवण तालुक्यातील मसूरे गावची एक छोटीशी वाडी. पण या वाडीतील भराडी देवीची वार्षिक जत्रेसाठी आता मुंबई-पुण्यातूनच नव्हे तर देश-विदेशातून मालवणी माणूस आवर्जून हजेरी लावतो. जत्रेची तारीख जाहीर झाली की, सिंधुदुर्गातील बहुतांश रिक्षांच्या मागे आंगणेवाडी जत्रेची तारील लिहली जाते. एसटीमध्येही खडूने जत्रेची तारीख लिहिली जाते. २०-२५ वर्षांपूर्वी ही जत्रा काही हजारांच्या घरात होती. आता मात्र ती लाखांची झाली आहे. गेल्यावर्षी १२ लाख भाविकांनी या जत्रेला हजेरी लावली होती अशी पोलिसांची आकडेवारी सांगते. यावेळी काँग्रेस आमदार नितेश राणे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, विनोद तावडे यांनीही भराडी देवीचं दर्शन घेतलं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Ladki Bahin Yojana : पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
BJP Maharashtra Cell in Charge list: आधी केंद्रीय पातळीवर बदल, आता राज्यातही भाजपने भाकरी फिरवली, प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
भाजपकडून पक्षसंघटनेतील महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर; अरुण लखानी, केदार जाधवकडे महत्त्वाची जबाबदारी
Devendra Fadnavis warns Mahayuti Leaders: महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग
महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग

व्हिडीओ

Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report
Manoj Jarange Jalna : सरकारने गाळला घाम पण जरांगे ठाम Special Report
Unemployed Youth : 9 कोटी तरुणाई घरी, का वाढली बेरोजगारी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
Ladki Bahin Yojana : पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
BJP Maharashtra Cell in Charge list: आधी केंद्रीय पातळीवर बदल, आता राज्यातही भाजपने भाकरी फिरवली, प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
भाजपकडून पक्षसंघटनेतील महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर; अरुण लखानी, केदार जाधवकडे महत्त्वाची जबाबदारी
Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Devendra Fadnavis warns Mahayuti Leaders: महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग
महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग
Dhruv Jurel Century : सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
Embed widget