Anil Jaisinghani Bookie Updateराज्याचे गृहमंत्र आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) फसवणूक प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला (Anil Jaisinghani) मुंबई सत्र न्यायालयाने (Bombay Session Court) जप्त केलेली इलेक्ट्रॉनिक गॅझेटस परत देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या 10 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणाच्या चौकशीसाठी अनिल जयसिंघानीचा आयफोन आणि आयपॅड  जप्त केला होता.


तर हे जप्त केलेले आयफोन आणि आयपॅड परत मागण्यासाठी सुमारे 18 महिन्यांनंतर जयसिंघानीनं मुंबई सत्र न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती. यासाठी या प्रकरणातील 26 वर्षीय आरोपी आणि कायद्याची विद्यार्थिनी अनिक्षा  जयसिंघानीनं ही द याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका फेटाळली असून अनिल जयसिंघानीला न्यायालयाने कुठलाही दिलासा दिला नसल्याचे पुढे आले आहे.


गुन्ह्याचं स्वरूप लक्षात घेता दाव्यात तथ्य दिसत नसल्याचे कोर्टाचे मत 


देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी हायकोर्टानं बुकी अनिल जयसिंघानीला यापूर्वीच जामीन मंजूर केला आहे. मात्र, त्यानंतर न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेने जप्त केलेली इलेक्ट्रॉनिक गॅझेटस परत मिळवण्यासाठी सुमारे 18 महिन्यांनंतर जयसिंघानीनं मुंबई सत्र न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती. मात्र डेटा गोळा करण्याचं कम अद्यापही सुरू असल्याचे सांगत एसीबीनं सादर केलेल्या अहवालानंतर मुंबई सत्र न्यायालयाने  इलेक्ट्रॉनिक गॅझेटस परत देण्यास कोर्टाने नकार देण्याचे निर्देश दिले आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) कडे या प्रकरणातील अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरण पोलिसांनी जमा केली होती.


तर पुढील अभ्यासासाठी या उपकरणांची गरज असल्याचा दावा या प्रकरणातील 26 वर्षीय आरोपी आणि कायद्याची विद्यार्थिनी अनिक्षा  जयसिंघानीनं केला होता. सोबतच उपकरणं जप्त केल्यामुळे सर्व सोशल मीडिया आणि कम्युनिकेशन खात्यांमधून लॉग आउट झाल्याची माहितीही या  याचिकेतून  न्यायालयापुढे मांडण्यात आली होती. मात्र, गुन्ह्याचं स्वरूप लक्षात घेता या दाव्यात तथ्य दिसत नसल्याचे सांगत जप्त केलेल्या वस्तूंचे विश्लेषण करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज (FSL) ला प्राधान्य द्यावं, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.


नेमकं काय आहे प्रकरण?


एका केसमध्ये मदत करण्यासाठी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी या तरुणीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांना धमकी देखील देण्यात आली अशी तक्रार अमृता फडणवीस यांनी मुंबईतील (Mumbai) मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये (Malabar Hill Police Station) 20 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर अनिक्षाविरोधात गुन्हा दाखल झाला. अनिक्षा ही गेल्या 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत 1 कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 


हे ही वाचा