Malegaon Bandh : मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगावात बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली आहे. कल हिंदू समाजाच्या वतीनं बंदची हाक देण्यात आली आहे. हिंदुत्ववादी संघटना आणि सर्व पक्षीय बंदमध्ये सहभागी होणार आहेत. मालेगावच्या हिंदू बहुल पश्चिम पट्ट्यात कडकडीत बंद पाळला जाणार आहे. तसेच, स्मशान मारोती मंदिर येथे झालेल्या सर्वपक्षीय तसेच सर्व सामाजिक संघटनांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. 


नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील मालेगावात (Malegaon) कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये हिंदुत्ववादी संघटना आणि सर्वपक्षीय सहभागी आहेत. मालेगावच्या हिंदूबहुल पश्चिम पट्ट्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. स्मशान मारूती मंदिर इथे सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अधिकची कुमक देखील मागविण्यात आलेली आहे. दरम्यान, आज दुपारी रामसेतू पुल येथून सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.  


बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली. हिंदुत्ववादी संघटना, सर्वपक्षीय संघटना आणि सकल हिंदू समाज बंदमध्ये सहभागी होणार आहे. विशेष करून मालेगावच्या हिंदू बहुल पश्चिम पट्ट्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अधिकची कुमक देखील मागविण्यात आलेली आहे. दरम्यान, आज दुपारी रामसेतू पुल येथून सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले असून अपर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येवून निवेदन देण्यात येणार आहे.