मुंबई : अमरावतीत झालेल्या दंगलीमागे रझा अकादमीसह अनेक राजकीय पक्षांचाही हात असल्याचा महाराष्ट्र पोलिसांना संशय आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, अमरावती हिंसाचारात रझा अकादमीबरोबरचं भाजप आणि युवा सेनेच्याही लोकांचाही हात होता. यामुळे केवळ काही मुस्लिम संघटनांनाकडूनच नाही तर राजकीय पक्षांनीही अमरावतीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग केला होता, असा अहवाल पोलिसांकडून गृहविभागाला सादर करण्यात आला आहे. 


नुकताच अमरावती पोलिसांनी हा अहवाल गृहखात्याकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान या दंगली भडकवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आल्याचेही या अहवालात म्हटले आहे. 


दंगलींबाबत पोलिसांच्या अहवालात काय?



  • 29 ऑक्टोबर रोजी 'पीएफआय' सदस्य त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात

  • 1 नोव्हेंबर रोजी जय संविधान संघटनेनंही जिल्हाधिकार्‍यांकडे निषेध नोंदविला

  • 6 नोव्हेंबर रोजी सरताज नावाच्या व्यक्तीचा एक चिथावणीखोर ऑडिओ मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल

  • 12 नोव्हेंबर रोजी रझा अकदमीकडून बंद पुकारण्याचं आवाहन, सोशल मीडियावर अनेक मेसेज फॉरवर्ड 

  • 12 नोव्हेंबरला अमरावतीत हिंसाचार, या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवण्यात आले 

  • 13 नोव्हेंबर रोजी अमरावतीत पुन्हा बंद, यामागे भाजप, बजरंग दल आणि युवा सेनेचा हात असल्याची सूत्रांची माहिती 


महाराष्ट्र पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेशी संबंधित अनेक नावं समोर आली आहे परंतु त्यांची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. नावांची पडताळणी झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.


मालेगावातील रझा अकादमीच्या लल्ले चौकातील कार्यालयावर छापा 


नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात शुक्रवारी झालेल्या दगडफेकी प्रकरणी बंद पुकारणाऱ्या रझा अकादमी संघटना पोलिसांच्या रडारवर आली आहे. मालेगावातील लल्ले चौकातील कार्यालयावर छापा मारत स्थानिक पोलिसांनी दोन तास झडती घेतली. त्यात बंदचं आवाहन करणारी पत्रकं आणि दस्तावेज जप्त केले. पोलिसांच्या छाप्यामुळे अन्य धार्मिक संघटनाही हादरल्या आहेत. त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ रझा अकादमी संघटनेनं बंदची हाक दिली होती. यावेळी पोलिसांनी पंचांसमोर कार्यालयाचं कुलूप तोडून झडती घेतली. त्यात बंदचं आवाहन करणारी उर्दू भाषेतील काही पत्रकं पोलिसांनी जप्त केली आहेत. यासह एक रजिस्टर आणि काही पुस्तकंही ताब्यात घेतली.


मालेगाव पोलिसांची कारवाई


मालेगावमध्ये आतापर्यंत पोलिसांनी पाच गुन्हे दाखल  केले असून 42 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस आता ज्या ठिकाणी सरकारी मालमत्तेचं नुकसान झाले त्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहे. पोलिसांनी रझा अकादमीशी संबधित डॉ. रईस रिझवी, शेख अक्रम आणि शेख आरिफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


अमरावती पोलिसांची कारवाई


अमरावतीतील हिंसाचारानंतर पोलिसांनी 35 गुन्हे दाखल आहे. आतापर्यंत 198 जणांना अक केली आहे,. अटक करण्यात आलेल्यांपैकी 24 जण भाजपचे असून त्याचील तीन जण माजी मंत्री आहेय


नांदेड पोलिसांची कारवाई


नांदेडमध्ये झालेल्या हिंसेनंतर नांदेडमध्ये 84  FIR दाखल करण्यात आल्या असून आतापर्यंत 64 जणांना अटक करण्यात आली आहे. 


Amravati मधले दंगे नेमके कुणी घडवले? 



संबंधित बातम्या :


Amravati Violence : अमरावती शहरातील इंटरनेट सेवा पुढील 2 दिवस बंदच; संचारबंदीत काही प्रमाणात शिथिलता