Amravati News अमरावती : अमरावती जिल्ह्यातील (Amravati News) शेतकर्यांची 183 विद्यार्थ्यांना परदेशी वारी करण्याची संधी मिळाली आहे. अमरावतीतील पी. आर.पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप यांच्या माध्यमातून दुबई येथे 183 विद्यार्थ्यांकरिता दुबई अभ्यास दौरा आयोजित केला आहे. विविध विभागातील विद्यार्थ्यांची या विदेश वारीकरीता निवड झाली असून तेथील औद्योगिक भेटी तसेच विद्यापीठाला हे विद्यार्थी भेटी देणार आहे. पी. आर. पोटे पाटील एज्युकेशला ग्रुपच्या वतीने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकर्यांची 183 लेकरं निघाले दुबईला!
गेल्या दशकापासून या संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करता यावा, या करीता विदेश वारीचे आयोजन केल्या जाते. या संपूर्ण अभ्यासदौऱ्याचा खर्च हा पी.आर.पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप द्वारा करण्यात येतो. अभियांत्रिकी, एमबीए, एमसीए, फार्मसी, ऍग्रीकल्चर, बीएएमस , आर्किटेक्चर , नर्सिंग मधील 87 विद्यार्थ्यांची पहिली बॅच दुबई येथे नुकताच अभ्यास दौऱ्याकरीता रवाना झाले असून दुबई येथील आयटी कंपनी, ऑटोमोबाईल कंपनी , आर्टिफिशल इंटेलिजन्स वर काम करणाऱ्या कंपनी, तसेस इव्ही सेक्टर मधील कंपनीला आणि सोबतच युनिव्हर्सिटी ऑफ दुबई, बिट्स पिलानी युनिव्हर्सिटी दुबई, युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅमलाही हे विद्यार्थी भेटी देणार आहेत.
विविध नामांकित विद्यापीठ आणि कंपन्यांचा करणार अभ्यास दौरा
विद्यार्थी जीवनात शिक्षणासोबतच निःशुल्क दुबई, सिंगापूर, मलेशिया, जपान येथे अभ्यास दौऱ्याकरिता संधी देणारे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील पी.आर.पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप अमरावती एकमेव एज्युकेशनल ग्रुप असल्याचा दावा करण्यात आला आहे. सोबतच विद्यार्थ्यांचा विमानाने जाणे येणे , पंच तारांकित हॉटेलमध्ये राहणे हा संपूर्ण खर्च संस्थेचा असतो. पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप च्या दशकांपासून अविरत सुरु असलेल्या या विदेश वारीचे सर्वत्र पालक वर्गांमध्ये कौतुक होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI