Amol Kolhe : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe)   हे आज बैलगाडा शर्यतीत घोडीवर स्वार झाले होते. अखेर त्यांनी जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. पुणे जिल्ह्यातील निमगाव दावडी येथील घाटात आयोजीत केलेल्या शर्यतीत ते घोडीवर बसल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी कोरोना नियमांचे पालन करणाऱ्या सर्व बैलगाडा शर्यत मालकांचे तसेच शौकिनांचे आभार मानले. देशातील पहिला खासदार आज बैलगाडा घाटात घोडीवर बसल्याचे देशाने पाहिल्याचे मला पत्रकारांनी सांगितले. अमोल कोल्हे घोडीवर बसल्याचे कौतुक नाही तर बैलगाडा शर्यत ही राज्यात, देशात लोकप्रिय झाली पाहिजे असे कोल्हे यावेळी म्हणाले.
 
या सर्व शर्यतींचे डॉक्युमेंटेशन होणार आहे. ते सर्व खंडपाठीसमोर मांडले जाईल, त्यावेळी विजय आपलाच होणार असल्याचा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. आजची बैलगाडा शर्यत ही सर्व माध्यमांनी सगळीकडे लाईव्ह दाखवली. त्यामुळे निमगावचा घाट संपूर्ण राज्यात लाईव्ह गेला असल्याचे कोल्हे म्हणाले. देशातील पहिला खासदार आज बैलगाडा घाटात घोडीवर बसल्याचे देशाने पाहिले आहे. यामध्ये अमोल कोल्हे घोडीवर बसल्याचे कौतुक नाही.  तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी शर्यत देशात, राज्यात लोकप्रिय झाली पाहिजे. तिची लोकप्रियता आणखी वाढवायची आहे. त्यामाध्यमातून बैलगाडा शर्यत आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायची असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. 


दरम्यान, बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून पर्यटन आणि ग्रामीण रोजगाची संधी उपलब्ध व्हावी. बैलगाडा शर्यत हा केवळ नाद न राहता ती एक आत्मियतेची भावना आणखी वृद्धींगत व्हावी असे कोल्हे यावेळी म्हणाले. सर्वांनी साथ दिल्याबद्दल तसेच कोरोनाच्या नियमावलीचे सर्वांनी पालन केल्याबद्द अमोल कोल्हे यांनी आभार मानले.


लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द अखेर खासदार अमोल कोल्हे यांनी आज सत्यात उतरवला आहे. कोल्हे आज बैलगाडा शर्यतीत घोडीवर झाले 'स्वार' झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित असलेल्या जनसमुदायाने एकच जल्लोष केला. आज पुणे जिल्ह्यातील निमगाव दावडी येथील घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हे यांनी उपस्थिती दर्शवीत घोडीवर स्वार झाले. निमगाव दावडी हा खंडोबाच्या मानाचा हा घाट आहे. आज बैलगाडा मालक या मानाच्या घाटात स्वखुशीने त्यांच्या सर्जा-राजाची जोडी उतरवल्या आहेत. तिथेच आज खासदार अमोल कोल्हे त्यांचा शब्द पूर्ण केला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: