एक्स्प्लोर

Todays Headline 5th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..

ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार

कोरोनामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या  राज्यातील विविध 15 जिल्ह्यांमधील 62 तालुक्यातील  238 ग्रामपंचायतींच्या निवडणुकींसाठी काल मतदान पार पडले. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 78 टक्के मतदान पार पडले. ग्रामपंचायतीचा  निकाल आज जाहीर होणार आहे. 

वर्षा राऊतांना ईडीचं समन्स  

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED)  समन्स बजावलं आहे.  पत्राचाळ प्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स बजावले आहे. वर्षा राऊत यांना चौकशीसाठी आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

आरे प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 

आरे प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आरे कारशेडचं सुरु झालेलं बांधकाम थांबवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलीय. पर्यावरणप्रेमींकडून विविध सात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर आज एकत्रितपणे सुनावणी होण्याची शक्यता आहे.

पुढील चार दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज 

पुढील चार दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  मुंबईत 7 आणि  8 ऑगस्टला  यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचे आज आंदोलन

 महागाई आणि जीएसटीच्या  मुद्यांवरून  कॉंग्रेसकडून आज  देशभरात महागाईविरोधात आंदोलन केलं जाणार आहे. राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणार आहे.  याशिवाय पंतप्रधान भवनाला देखील घेराव घालण्याची काँग्रेसची योजना आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या शुक्रवारपासून चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून त्या आज  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधानांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालसंबंधीत जीएसटी आणि विविध विषयांवर चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला तीन वर्षे पूर्ण

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला शुक्रवारी तीन वर्षे पूर्ण होत आहेत.   जम्मू आणि काश्मीरमधून 5 ऑगस्ट 2019 साली कलम 370 हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेले कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक विधेयक लोकसभेत 351 विरुद्ध 72 मतांनी विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. यावेळी जम्मू काश्मीर राज्याचे दोन भाग करण्याचे विधेयक मांडण्यात आलं होतं. त्यानुसार जम्मू काश्मीर आणि लडाख अशी दोन राज्य बनवण्यात आली. दोन्ही राज्य केंद्रशासित घोषित करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget