एक्स्प्लोर

Raj Thackeray FIR : तोंडात बोळा कोंबा ते अभी नही तो कभी नही, पोलिसांच्या FIR मधील शब्द आणि शब्द जसाच्या तसा

Raj Thackeray Fir : औरंगाबादमध्ये राज ठाकरेंनी केलेल्या एकूण भाषणातील शेवटच्या साडेचार मिनिटाच्या भाषणामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  या दाखल गुन्ह्याची प्रत माझाच्या हाती लागलीय. औरंगाबादमध्ये राज ठाकरेंनी केलेल्या एकूण भाषणातील शेवटच्या साडेचार मिनिटाच्या भाषणामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दुसरीकडे  दुसरीकडे पोलीस राज ठाकरे यांना कलम 149 अंतर्गत नोटीस देण्यासाठी राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहचण्याची शक्यता आहे.

औरंगाबादच्या सिटी चौक पोलिस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यात राज ठाकरे हे मुख्य आरोपी आहेत तर औरंगाबादमधील खडकेश्वर परिसरातील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा केंद्राच्या मैदानावरील राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजक राजीव जावळीकर यांचा समावेश सहआरोपी म्हणून करण्यात आला आहे.

1 मे रोजी झालेल्या गुन्ह्याची नोंद तब्बल दोन दिवसांनंतर म्हणजे आज 3 तारखेला करण्यात आली आहे, एफआयआरमधील तरतुदींनुसार या विलंबासाठी सीसीटीव्ही फूटेज तसंच व्हिडिओ रेकॉर्डिंगची तपासणी करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ लागल्याचं या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलंय.  

राज ठाकरेंवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या प्रतीत काय म्हटले? 

माझी पोलिसांना नम्र विनंती आहे.  जर सभेच्या वेळेला बांग सुरु करणार असतील, आपण आत्ताच्या आत्ता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा. यांना जर सरळमार्गाने समजत नसेल, तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल, मला माहित नाही. येथे जे कुणी पोलीस अधिकारी असतील, तर त्यांना मी सांगतो, की आत्ताच्या आत्ता पहिले जाऊन बंद करा... आणि माझं एक म्हणणं आहे, या बाबतीत त्यांना जर समजा, सरळ भाषेत समजत नसेल ना... तर एकदा काय ते होऊन जाऊ द्या.... अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही. संभाजीनगरच्या पोलिसांना माझी नम्र विनंती. परत करतोय मी... आपल्याला परत सांगतोय... ते जर या पद्धतीने वागणार असतील... त्यांना जर सरळ सांगून समजत नसेल... तर महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे... ती यांना एकदा दाखवावीच लागेल. आणि म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे... की, ही पहिल्यांदा थोबाडं बंद करा या लोकांची. माझी संपूर्ण देशवासियांना, अख्ख्या देशातल्या माझ्या हिंदू बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की, बिलकुल मागचा पुढचा काही विचार करु नका. हे भोंगे उतरले गेलेच पाहिजेत. सगळ्या धार्मिक स्थळांवरचे. मग मंदिरावरचे असले, तरी उतरले गेले पाहिजेत. पण यांचे उतरल्यानंतर... आपण सगळे जण. आज ही परिस्थिती आहे... अभी नहीं तो कभी नहीं.... माझ्या देशातल्या सर्व देशवासियांना व हिंदू बांधवांना, भगिनींना विनंती आहे की, जर हे 3 तारखेपर्यंत ऐकले नाहीत... तर, 4 तारखेला मला हनुमान चालिसा ऐकू आलीच पाहिजे. पोलिसांकडून वाटल्यास परवानगी घ्या. रितसर परवानगी घ्या. लाऊडस्पीकरची परवानगी घ्या. त्यांना द्यावी लागते. पण ती परवानगी घेऊन, आपण सगळ्या गोष्टी जोरात कराल, सामाजिकदृष्या हा इतक्या वर्षांचा प्रलंबित प्रश्न हा कायमचा निकाली लागेल, यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावावा.

 सभेचे CCTV फुटेज रेकॉर्डिंगची तपासणी व अवलोकनात दिसून आले आहे. नमुद भाषणातील वक्तव्यामुळे सभेला उपस्थित असणा-या जनसमुदायाला कारावासाच्या शिक्षेस पात्र असणारा अपराध करण्यास चिथावणी मिळेल, त्यांच्याकडून गंभीर शांतताभंग होईल, त्यांच्याकडून सार्वजनिक प्शांतता विरोधी अपराध घडेल. जर दंगलीसारखा अपराध घडेल हे माहित असूनही बेछुट, चिथावणीखोर वक्तव्य करुन पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद शहरतर्फे त्यांना लेखी पत्राने घालून दिलेल्या व अटी व शर्तीचा भंग केला,  म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, संजीव जावळीकर आणि इतर संयोजकांविरुध्द भादंवि कलम 116,117,153 सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कायदेशीर फिर्याद करण्यात आली आहे

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget