मुंबई: राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत मात्र काहीशी चढ-उतार होत असल्याचं पहायला मिळतंय. राज्यात आज ओमायक्रॉनच्या 72 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे महापालिका क्षेत्रात सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 2930 रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1592 रुग्ण हे बरे झाले आहेत. 


राज्यात आज सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी पुणे शहरात 33 रुग्णांची नोंद झाली आहेत तर औरंगाबादमध्ये 19 रुग्णांची नोंद झाली आहे. त्या खालोखाल मुंबई आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी 5, ठाणे शहरात 3, यवतमाळ आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण सापडले आहेत. 


राज्यात आतापर्यंत 6400 लोकांची ओमायक्रॉन चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 6308 अहवाल प्राप्त झाले आहेत. 92 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. 


राज्यातील स्थिती
राज्यात गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या  25 हजार 425 नव्या रुग्णांची भर पडली असून 42 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 36 हजार 708  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 42 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.86 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 71 लाख 97 हजार 001 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के आहे.  सध्या राज्यात 15 लाख 31 हजार 108 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3259 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 40 लाख 12 हजार 958 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


महत्त्वाच्या बातम्या: