मुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण  कोरोनाची लागण झाली आहे. मंत्रीमंडळ बैठक सुरू असताना कोरोनाचा अहवाल आला.  कोरोनाचा अहवाल येताच मंत्रीमंडळ बैठकीतून 10  मिनिटांत अशोक चव्हण बाहेर पडले. सकाळी कॉंग्रेस बैठकीला अशोक चव्हाण उपस्थित होते.


आगामी निवडणुकांकरता सर्वच पक्षांनी आता कंबर कसायला सुरुवात केली आहे. स्वबळाचे नारे दिल्यावर निवडणुकीतील समिकरणं, डावपेच ठरवण्याकरता महाराष्ट्र  कॉंग्रेसचे प्रभारी एच.के पाटील दोन दिवसांच्या मुंबई दौ-यावर आहेत.  आज बैठकांचा पहिला दिवस होता. या वेळी   अशोक चव्हाण उपस्थित होते.  अशोक चव्हाणांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. 


अशोक चव्हाण यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वत: ट्वीट करत दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्या सर्वांना टेस्ट करण्याचे आवाहन केले आहे. 






गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 35 हजार 756 नव्या रुग्णांची भर पडली असून 79 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 39 हजार 857 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही. आतापर्यंत 2858 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1534 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. राज्यात आज 79 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 71 लाख 60 हजार 293 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.15 टक्के आहे.  सध्या राज्यात 15 लाख 47 हजार 643 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3298 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 38 लाख 67 हजार 385 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


महत्त्वाच्या बातम्या: