एक्स्प्लोर

Raj Thackeray: राज ठाकरे आता फक्त 'मराठी हृदयसम्राट'; इतर कोणतीही पदवी न लावण्याचा आदेश

Raj Thackeray: मनसे प्रमुख राज ठाकरे यांना 'मराठी हृदयसम्राट' या व्यतिरिक्त कोणतीही पदवी लावू नये असा आदेश देण्यात आला आहे.

मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे यांना यापुढे आता केवळ 'मराठी हृदयसम्राट' ही पदवी लावावी, इतर कोणतीही पदवी लावण्याचा उद्योग करु नये असा आदेश पक्षाच्या वतीनं देण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजगड मध्यवर्ती कार्यालयाने हा आदेश जारी केला असून त्याचे तंतोतंत पालन करण्याचा आदेशही देण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांसाठी एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, "महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या हृदयात सर्वोच्च स्थान असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नावापुढे सध्या प्रचलित असलेल्या “मराठी हृदयसम्राट” या उपाधी व्यतिरिक्त इतर नवीन कोणतीही उपाधी लावण्याचा उद्योग करू नये. कृपया या सूचनेचे तंतोतंत पालन व्हावे ही नम्र विनंती."

घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचे बॅनर उभारण्यात आले होते. त्यावर 'हिंदू हृदयसम्राट' अशी उपाधी राज ठाकरेंच्या नावापुढे लावण्या आली होती. त्यानंतर पक्षाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. या घटनेची गंभीर दखल मनसेच्या वतीनं घेण्यात आली आहे. घाटकोपरच्या घटनेनंतर मनसेच्या वतीने हा आदेश जारी करण्यात आला आहे. 

राज ठाकरेनी मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याचं जाहीर केलं शिवसेना सोडून 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत मराठीच्या मुद्द्यावर या पक्षाने तब्बल 13 जागा जिंकल्या होत्या. 

राज ठाकरेंचा प्रमुख अजेंडा हा मराठी हाच आहे. मध्यंतरी मनसे भाजपसोबत युती करणार असल्याची चर्चा सुरू होती. पण भाजपने मनसेला मराठीच्या मुद्द्याचा त्याग करण्याची अट घातल्याचं समजतंय. याच मुद्द्यावरुन मनसेची आणि भाजपची होऊ घातलेली युती तुटल्याची चर्चा आहे. 

राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्याला आपला अजेंडा बनवणार अशी चर्चा सुरू होती. पण आजच्या पक्षाच्या या आदेशाने मराठीचा मुद्दा हाच पक्षासाठी महत्त्वाचा असून त्यावर आगामी मुंबई पालिकेच्या निवडणुका लढवण्यात येतील असे संकेत देण्यात आले आहेत.  

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
Maharashtra Live blog updates: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
Nitesh Karale: नितेश कराळेंची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी, कारवाईनंतर मास्तर ओक्साबोक्शी रडले; नंतर थेट आक्रमक इशारा देत म्हणाले, शरद पवारांविषयी आदर, पण...
नितेश कराळेंची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी, कारवाईनंतर मास्तर ओक्साबोक्शी रडले; नंतर थेट आक्रमक इशारा देत म्हणाले, शरद पवारांविषयी आदर, पण...
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या पाच जागांसाठी आज मतदान, 182 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला, वाचा सर्व अपडेट
शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या पाच जागांसाठी आज मतदान, 182 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला, वाचा सर्व अपडेट
सुकाळातल्या जागा बिनविरोध कशा झाल्या? कार्यकर्त्यांनी विरोधात लढायचं आणि नेत्यांनी सत्तेची भाकरी एकत्र बसून खायची, खोतांचा हल्लाबोल, म्हणाले, गोपीचंद पडळकर विस्थापितांचा आवाज
सुकाळातल्या जागा बिनविरोध कशा झाल्या? कार्यकर्त्यांनी विरोधात लढायचं आणि नेत्यांनी सत्तेची भाकरी एकत्र बसून खायची, खोतांचा हल्लाबोल, म्हणाले, गोपीचंद पडळकर विस्थापितांचा आवाज

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dengue Death in Pune : आधी ताप अन् पोटदुखीचा त्रास; श्वास घेता येईना, प्लेटलेट्सची संख्या घसरली, पुण्यात डेंगीचा पहिला बळी; आठ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
आधी ताप अन् पोटदुखीचा त्रास; श्वास घेता येईना, प्लेटलेट्सची संख्या घसरली, पुण्यात डेंगीचा पहिला बळी; आठ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
Nitesh Karale: नितेश कराळेंची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी, कारवाईनंतर मास्तर ओक्साबोक्शी रडले; नंतर थेट आक्रमक इशारा देत म्हणाले, शरद पवारांविषयी आदर, पण...
नितेश कराळेंची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी, कारवाईनंतर मास्तर ओक्साबोक्शी रडले; नंतर थेट आक्रमक इशारा देत म्हणाले, शरद पवारांविषयी आदर, पण...
Chhatrapati Sambhaji nagar Crime Bunty Dixit Case: छत्रपती संभाजीनगरमधील फेसबुक किंग बंटी दीक्षितचा भयानक शेवट, मित्रानेच संपवलं, लोखंडी रॉडने चेहरा बिघडवून टाकला
छत्रपती संभाजीनगरमधील फेसबुक किंग बंटी दीक्षितचा भयानक शेवट, मित्रानेच संपवलं, लोखंडी रॉडने चेहरा बिघडवून टाकला
Maharashtra Live blog updates: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
Maharashtra Live blog updates: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
Sri Lanka vs England: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Video: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Raju Shetti: 'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
Embed widget