मुंबई :   राज्यात आज 2279 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2646  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे महानगरपालिकेतील आहे. पुणे महानगरापालिकेत सर्वाधिक म्हणजे 441 रुग्णांची भर पडली आहे. 


सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू


राज्यात आज  सहा  कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे   राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,59,960 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.97 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात एकूण 14789 सक्रिय रुग्ण


राज्यात एकूण 14789 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 5413  इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये 2093  सक्रिय रुग्ण आहेत.


दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट


 देशात गेल्या 24 तासांत 15 हजार 528 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय सोमवारी दिवसभरात 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी देशात 16 हजार 935 नवीन रुग्णांची नोंद आणि 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याआधी सलग चार दिवस वीस हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.  देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. भारतात सध्या 1 लाख 43 हजार 654 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण 5 लाख 25 हजार 785 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


केंद्र सरकारकडून आजपासून 'कोविड लस अमृत महोत्सव' अंतर्गत पुढचे 75 दिवस बूस्टर डोस (Booster Dose) मोफत दिला जाणार आहे. सगळ्या महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर 30 सप्टेंबरपर्यंत मोफत डोस मिळणार आहे. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना बूस्टर डोस घेता येणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली असून याच निमित्तानं देशात 75 दिवसांसाठी 'कोविड लस अमृत महोत्सव' राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी बूस्टर डोस घ्यावा, हाच त्यामागील मुख्य हेतू आहे.