Corona Mask : जगभरात कोरोना व्हायरसचा (Covid19) नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनने (Omicron) दहशत निर्माण केली आहे. राज्य सरकारकडून या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही राज्यात कडक निर्बंधही लादण्यात आले. त्यानुसार, आता कोरोनाची संख्या काहीशी घटताना दिसत आहे. काल (गुरुवारी) राज्याच्या कॅबिनेटमध्ये मास्कमुक्ती संदर्भात चर्चा झाली. इतर देशांमध्ये ज्याप्रमाणे मास्कमुक्ती करण्यात आली आहे. तशीच महाराष्ट्रातही मास्कमुक्ती होऊ शकते का? याबाबत तज्ञांचं मत जाणून घेऊयात.


मास्कमुक्तीबाबत काय आहे तज्ञांचा सल्ला ?


डॉ. रवी गोडसे यांनी मास्कच्या (Mask) बाबतीत असे म्हटले आहे की, "मास्क ऐच्छिक करा सक्ती करू नका. कोरोनाचा प्रादुर्भाव जरी असला तरी या गोष्टी सक्तीने नाही तर प्रेमाने होतात, समजावून होतात. त्यामुळे ज्यांना मास्क वापरायचा आहे त्यांना वापरू द्या. पण, ज्यांना नाही वापरायचा ते तसेही वापरत नव्हते. त्यामुळे ही सक्ती करू नका". असं स्पष्ट मत डॉ. रवी गोडसे यांनी व्यक्त केलं आहे. 


तसेच, कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनबद्दल बोलताना ते म्हणाले, ओमायक्रॉन हा तसा फारसा गंभीर आजार नाहीये. परंतु, त्याबाबत खबरदारी घेेणे गरजेचे आहे. या रोगाचा अधिक प्रादुर्भाव पसरू नये याकरता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्यासही सांगितले आहे. 


तर, टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी असं म्हटलं आहे की, "सद्यस्थितीत मास्क मुक्ती शक्य वाटत नाही. आणखी काही महिने तरी मास्क आपल्याला घालणे गरजेचे आहे. जेणेकरून आपलं संरक्षण होईल."


पाहा व्हिडीओ : महाराष्ट्रात मास्कमुक्ती व्हावी का? काय आहे तज्ञांचा सल्ला



 


आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्यांवर महापालिकेअंतर्गत सामान्य नागरिकांकडून किमान लाखो रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 


महाराष्ट्रात कोरोना (Covid19) रूग्णांच्या संख्येचा आकडा काहीसा घटताना दिसत असला तरी, अजूनही मास्कमुक्ती करण्यात आली नाही. जाणून घेऊयात, कोणकोणत्या देशांनी मास्कमुक्तीच्या दिशेने पाऊले उचलली आहेत. 


कुठले देश मास्कमुक्तीच्या दिशेने ?


इस्रायल - इस्त्रायलमध्ये 70 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याने मास्कचा वापर बंधनकारक नाही. 

न्यूझीलंड - न्यूझीलंडमध्ये मास्क वापरण्याची सक्ती नाही. 


इंग्लंड - इंग्लंड मास्कमुक्तीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha