मुंबई: अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने ही कारवाई केली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी वकिली आचारसंहितेचं उल्लंघन करुन, वकिली गणवेशात आंदोलनात भाग घेतल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते आता दोन वर्षांसाठी कोणत्याही कोर्टात वकिली करु शकणार नाहीत, किंवा कुणाचीही बाजू मांडू शकणार नाहीत. 


वकिलांसाठी एक आचारसंहिता असते, त्याचं उल्लंघन केल्याची तक्रार करण्यात आली आहे. वकिलीची वेशात सार्वजनिक ठिकाणी आंदोलन केल्याचं ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यावरुन सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.


अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यातील पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या आंदोलनाबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. दोन वर्षासाठी आता सदावर्ते कोणत्याही कोर्टात वकिली करु शकणार नाहीत, कुणाचीही बाजू मांडू शकणार नाहीत. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल या निर्णयाला अॅड. गुणरत्न सदावर्ते हे आव्हान देणार असल्याची माहिती आहे. 


अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर या आधीही अशी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळीही सदावर्ते यांनी त्या निर्णयाला आव्हान दिलं होतं.


अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी


अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील वागळे इस्टेटमधील कार्यालयात दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी कार्यालयाच्या खिडक्यांचे ग्रील कापून आत प्रवेश केला आणि सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कापली. इतकंच नव्हे तर संपूर्ण कार्यलयामधील स्लायडिंग खिडक्यासुद्धा उचकटून काढल्या आणि कार्यालयातील महागडा एलईडी टीव्ही, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन आदींसह इतर वस्तू असा अंदाजे साडेचार लाख रुपयांची सामग्री घेऊन पोबारा केला.  


ही चोरी डायमंड गँग नावाच्या एका टोळीने केल्याचा आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. कोविड काळनंतर बंद पडलेल्या कार्यालयांना ही टोळी लक्ष करते आणि त्यातील माल चोरुन भंगारमध्ये विकते. आपल्याही बंद असणाऱ्या या कार्यालयात याच डायमंड गॅंगने चोरी केली असून मालही भंगार दुकानात विकल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


ही बातमी वाचा :