Delhi High Court: राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात दिल्ली हायकोर्टानं संजय राऊत (MP Sanjay Raut), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना समन्स बजावलं आहे. कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेशही दिल्ली उच्च न्यायालयानं दिले आहेत. 


शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक मानहानी प्रकरणी एक याचिका दाखल केली होती. ज्या-ज्या आमदार, खासदारांनी एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) पाठिंबा दिला होता. त्या-त्या आमदार, खासदारांबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केली असल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे. याच मानहानी प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं आज याचिका दाखल करुन घेतली आणि खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांना समन्स बजावलं आहे. तसेच, कोर्टानं तिघांनाही याप्रकरणी स्वतः वैयक्तिकरित्या कोर्टात हजर राहून या आरोपांसंदर्भात स्वतःची बाजू मांडावी, अशा सूचनाही न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं यासंदर्भात अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.


पाहा व्हिडीओ : Delhi High Court : दिल्ली हायकोर्टकडून Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, Sanajay Raut यांना समन्स



सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर म्हणजेच, गूगल, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदार, खासदार यांच्यासंदर्भात केलेली वक्तव्य अजुनही आहेत. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयानं या प्रकरणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मविरोधात नोटीस काढली आहे. तसेच, त्यांना विचारणा केली आहे की, तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अद्यापही या तिघांनी आमदार, खासदारांबाबत केलेल्या वक्तव्यांसंदर्भात पोस्ट आहेत. त्या हटवण्यात का आलेल्या नाहीत, यासंदर्भात खुलासा करण्यास सांगितलं आहे. 


दरम्यान, याप्रकरणाची पुढची सुनावणी 17 एप्रिल रोजी दिल्ली उच्च न्यायालयात पार पडणार आहे. या सर्व घडामोडींमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे तिघेही दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहणार का? आणि न्यायालयात काय स्पष्टीकरण देणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Election : राज्यातील 257  कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका 30 एप्रिलला, शिवसेनेचा ठाकरे गट आणि वंचित एकत्र लढणार