एक्स्प्लोर

मंत्रिमंडळात असण्याच्या लायकीचे लोकं आहेत का? मुख्यमंत्र्यांना हे पटतंय का? आदित्य ठाकरेंचा सवाल

अशोक खरात फाइल्स हा सगळा गलिच्छ प्रकार आहे. किळसवाना प्रकार आहे. जे काही ऐकतोय ते भयानक असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

Aaditya Thackeray :  अशोक खरात फाइल्स हा सगळा गलिच्छ प्रकार आहे. किळसवाना प्रकार आहे. जे काही ऐकतोय ते भयानक असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओसंदर्भात विचारले असता, ठाकरे म्हणाले की, मी व्हिडिओ पाहिलेला नाही आणि पाहायची इच्छा देखील नाही. हे प्रकरण तर आहेच पण त्यांच्या पीएलाही लाच घेताना अटक करण्यात आली होती.  साताऱ्यात काय झालं ते आपण बघितलेलं आहे. कोण मुख्यमंत्र्यावर टीका करणारा मंत्री आहे, कोण मार खाणारा मंत्री आहे, असा सगळा कारभार  घेऊन मुख्यमंत्री कुठपर्यंत काम करणार आहेत. ही वेगवेगळी प्रकरण समोर येत आहेत, हे मुख्यमंत्र्यांना पटतंय का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. या सगळ्यात प्रकरणात असणारी लोकं मंत्रिमंडळात असण्याच्या लायकीची आहेत का? हे मुख्यमंत्र्यांनी बघावं असे ठाकरे म्हणाले. 

भूमिपुत्र स्थानिकांना रोजगार देण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी शिवसेना सदैव कार्यरत 

80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण ही शिवसेनेची ओळख आहे. भूमिपुत्र स्थानिकांना रोजगार देण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी शिवसेना सदैव कार्यरत असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.  यासाठीच रोजगार मेळाव्याचं आज आयोजन करण्यात आलं आहे. अशा अनेक रोजगार मेळाव्यांचे आयोजन महाराष्ट्रभर आम्ही करणार आहोत असे ठाकरे म्हणाले.  

चुकीच्या बातम्या काही लोक पेरत आहेत, आम्ही काडीमात्र किंमत देत नाही

ऑपरेशन टायगरबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांचे खासदारही त्यांच्या संपर्कात असतील, 33 देशातले खासदार त्यांच्या संपर्कात असतील, त्यामुळं त्याची जगभर चर्चा असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटाला लगावला. मातोश्री झालेल्या खासदारांच्या बैठकीबाबत देखील आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. बातमी तुम्हीच लावणार आणि उत्तरही आमच्याकडून मागणार असे ठाकरे म्हणाले. चुकीच्या बातम्या काही लोक पेरत आहेत. आम्ही या सगळ्याला काडीमात्र किंमत देत नाही असे ठाकरे म्हणाले. 

गेल्या काही दिवसापासून राज्यात विविध मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये अशोक खऱात प्रकरण समोर आल्यानं राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. खरातबरोबर अनेक राजकीय नेत्यांचे फोटो आहेत. या प्रकरणामुळं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. त्याचबरोबर मंत्री नरहरी झिरवाळ यांचा देखील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरुन जरदार टीका होत आहे. 

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget