एक्स्प्लोर

अमोल काळे, वीरेंद्र तावडे हेच दाभोलकरांच्या हत्येचे मास्टरमाईंड : सीबीआय

अमोल काळे आणि वीरेंद्र तावडेच्या आदेशावरुनच सचिन अंदुरे आणि शरद कळसकरने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा संशय सीबीआयला आहे.

मुंबई : अमोल काळे आणि वीरेंद्र तावडे हे दोघे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे मास्टरमाईंड असल्याचा संशय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) आहे. त्यामुळेच अमोल काळेची सखोल चौकशी करण्यासाठी त्याची कोठडी घेण्याची तयारी डॉ. दाभोलकर हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआय टीमने केली आहे. इतकंच नव्हे, तर अमोल काळे आणि वीरेंद्र तावडेच्या आदेशावरुनच सचिन अंदुरे आणि शरद कळसकरने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा संशय सीबीआयला आहे. कशी झाली दाभोलकरांची हत्या? डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात शरद कळसकर आणि सचिन अंदुरे हे शूटर आहेत, तर या हत्येचे अमोल काळे आणि वीरेंद्र तावडे हे सूत्रधार आहेत, असा दावा सीबीआयने केल्याचे सूत्रांनी सांगितले. अमोल काळेला गौरी लंकेश हत्या प्रकरणात बंगळुरु एसआयटीने अटक केली आहे. “दाभोलकरांच्या हत्येसाठी अमोल काळेने अंदुरे आणि कळसकरला शस्त्र दिली आणि पुण्यात बाईकचं नियोजन केले. हत्येच्या 10 दिवस आधी परिसराची रेकी अमोल काळेनेच केली. कुठे सीसीटीव्ही आहे का, याची पाहणी केली. या सर्व कटामागे वीरेंद्र तावडेचं ब्रेन आहे.”, असे सीबीआयने सांगितले. “दाभोलकरांच्या हत्येच्या एका दिवसापूर्वी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे औरंगाबादमधून पुण्याकडे निघाले. सकाळी पुण्यात पोहोचले. त्यानंतर त्यांना दोन हत्यारं आणि बाईकची किल्ली देण्यात आली. ओंकारेश्वर पुलाजवळील मॉलसमोर बाईक पार्क करण्यात आली. त्याचवेळी 7 वाजून 10 मिनिटांनी नरेंद्र दाभोलकर ओंकारेश्वर पुलाजवळ पोहोचले. तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीकडून अंदुरे आणि कळसकरने दाभोलकर असल्याचे कन्फर्म केले आणि कळसकरने दोन राऊंड, अंदुरेने एक राऊंड फायर केले. त्यानंतर बाईक पुण्याच्या बाहेर जाऊन पार्क करुन, ते औरंगाबादला पळाले. संध्याकाळी 5 वाजता ते औरंगाबादला पोहोचले", अशी माहिती सीबीआयने दिली. “गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अमोल काळेनेच सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना या हत्येच्या कटात सहभागी करुन घेतले. औरंगाबादजवळील जंगलात प्रशिक्षण देण्यात आले. गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक केलेल्या अन्य एकाने अंदुरे आणि कळसकरला प्रशिक्षण दिले.” असेही सीबीआयच्या सूत्रांनी सांगिलते. अमोल काळे, वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे अटकेत गौरी लंकेश हत्या प्रकरणी अमोल काळे याला मे महिन्यात बंगळुरु एटीएसने अटक केली आहे, तर वीरेंद्र तावडे याला दाभोलकर हत्या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. शरद कळसकर हा नालासोपारा स्फोटक प्रकरणात महाराष्ट्र एटीएसच्या हाती लागला. त्यावेळी तपासातच कळसकरचा दाभोलकर हत्येशी संबंध असल्याचे लक्षात आले आणि अधिक चौकशीनंतर त्याचा दाभोलकर हत्येशी थेट संबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याला सीबीआयकडे सोपवण्यात आले. त्यानंतर कळसकरच्या चौकशीत सचिन अंदुरेचे नाव समोर आले. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे मित्र आहेत. अमोल काळे कोण आहे? अमोल काळे हा 48 वर्षीय असून, तो पुण्याच्या माणिक कॉलनीतील अक्षय प्लाझातील रहिवासी आहे. पत्नी जागृती, पाच वर्षांचा मुलगा, म्हातारी आई यांच्याबरोबर पुण्यातील घरी अमोल राहत असे. वडिलांचं पानाची दुकान होतं, काही महिन्यांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला. अमोल काळेचं डिप्लोमापर्यंतचं शिक्षण झालं असून, स्पेअर पार्टस पुरवण्याचा धंदा करत होता. कधी कधी धार्मिक पुस्तकांची विक्रीही अमोल काळे करायचा. कोण आहे वीरेंद्र तावडे? वीरेंद्र तावडे हा पेशाने डॉक्टर असून, काना, नाक आणि घशाचा तज्ञ आहे. पनवेलमधल्या सनातनच्या आश्रमात तीन वर्षांपासून साधकांची आरोग्यसेवा करतो. 15 वर्षांपासून सनातनचा साधक आहे. सचिन अंदुरे कोण आहे? सचिन अंदुरे नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याचा मित्र आहे. सचिनचे आई-वडील हयात नाहीत. पत्नी आणि एक मुलगी असा त्याचा परिवार आहे. सचिन औरंगाबादमधील राजबाजार कुवारफल्ली भागात भाड्याच्या घरात गेल्या 10 महिन्यांपासून राहत होता.  निराला बाजार भागात कपड्याच्या दुकानात सचिन काम करतो. 14 ऑगस्ट रोजी एटीएसने सचिन अंदुरेला निरालाबाजार येथून अटक केली. ज्या दिवशी अटक केली, त्या दिवसापासून त्याच्या घराला कुलूप आहे. शरद कळसकर कोण आहे? शरद कळसकर मूळचा औरंगाबादमधील केसापुरीचा रहिवासी आहे. औरंगाबादच्या विवेकानंद महाविद्यालयात बारावीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्याने शिक्षण सोडलं. गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापुरात लेथ मशीनवर काम करत असल्याचं घरी शरदने सांगितले होते. वडिलांकडे सहा एकर शेती आहे. शरदला पुणे, सोलापूर, सातारा, नालासोपाऱ्यात घातपाताच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून, डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केल्याची कबुलीही शरदने दिली आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण 20 ऑगस्ट 2013 रोजी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर हत्या करण्यात आली. डॉ. दाभोलकर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना, मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली. आज (20 ऑगस्ट 2018) डॉ. दाभोलकरांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget