एक्स्प्लोर

Nilesh Lanke : अजित पवारांच्या मध्यस्थीला यश, नितीन गडकरींच्या आश्वासनानंतर आमदार निलेश लंकेंचं उपोषण मागे

Nilesh lanke : ) राष्ट्रवादीचे (NCP) आमदार निलेश लंके यांनी उपोषण (hunger strike ) मागे घेतले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या आश्नासनानंतर लंके यांनी आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

अहमदनगर : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले उपोषण (hunger strike) राष्ट्रवादीचे (NCP) आमदार निलेश लंके (Nilesh lanke) यांनी मागे घेतले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या आश्नासनानंतर लंके यांनी आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत लिंबू पाणी घेत लंके यांनी उपोषण स्थगित करत असल्याचे घोषित केले. नितीन गडकरी यांनी दूरध्वनी द्वारे लंके यांच्यासोबत संपर्क साधला आणि रस्ते दुरुस्तीबाबत आश्वासन दिले. 

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक महामार्गांच्या झालेल्या दुरवस्थेवरून आमदार निलेश लंके गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसले होते. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, आ. प्राजक्त तनपुरे आणि आ. रोहित पवार यांनी लंके यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील लंके यांची भेट घेतली होती. आज अजित पवार यांनी मध्यस्थी करत निलेश लंके यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन लंके यांनी आपले उपोषण मागे घेतले. लंके यांनी उपोषण मागे घेतल्याने अजित पवार यांच्या मध्यस्थीला यश आलं आहे. 

निलेश लंके यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर नितीन गडकरी यांनी काम पूर्ण करण्याचा शब्द दिल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. "वेळेत काम पूर्ण केलं जाईल असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिली. निलेश आणि मी पाठपुरावा करणार ओहोत. कोरोना काळात देखील जीव धोक्यात घालून निलेश लंके यांनी मोठं काम केलंय, असे कौतुक अजित पवार यांनी केलंय. 

अजित पवार यांनी यावेळी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. "सरकार आल्यापासून अनेक जण वाचाळवीर झाले आहेत. राज्यपालांपासून सगळे सत्ताधारी काहीही बोलतात. महाराष्ट्राचे मंत्री काम करण्यासाठी झाले की अशी वक्तव्य करण्यासाठी? असा प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनी आमदार प्रसाद लाड, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेकांवर टीका केली. याबरोबरच या सर्वांना येत्या 17 तारखेच्या मोर्चात उत्तर देऊ असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई गेल्या काही दिवसांपासून सतत वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यांच्यावर देखील यावेळी अजित पवार यांनी हल्लाबोल केला. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्रीच अशी वक्तव्य करणार असेल तर प्रश्न सोडवणार कोण? ज्या कर्नाटकात आपल्यावर अन्याय होतो त्याच कर्नाटक बँकेला मदत देण्याचे काम या सरकारने केले. अरे ला कारे करण्याची गरज असताना ही कामाची पद्धत कोणती? असा प्रश्न यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला.  

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?
Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
Jalgaon News : गट विकास अधिकाऱ्याची मुजोरि, न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसलेल्या तरुणालाच कानशिलात लगावली, जळगावच्या पाचोऱ्यात नेमकं काय घडलं?
गट विकास अधिकाऱ्याची मुजोरि, न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसलेल्या तरुणालाच कानशिलात लगावली, जळगावच्या पाचोऱ्यात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
Maharashtra Live blog updates: एल निनोमुळे हिंदुकुश हिमालयात पूर, भूस्खलन आणि हिमस्खलनाचा धोका
Maharashtra Live blog updates: एल निनोमुळे हिंदुकुश हिमालयात पूर, भूस्खलन आणि हिमस्खलनाचा धोका
PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
Embed widget