एक्स्प्लोर

अमरसिंह पंडितांची नाराजी दूर, बजरंग सोनवणेंना निवडून आणण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

' इतरांनी आमची काळजी करण्याची गरज नाही. माझा भाऊ भावनेच्या भरात निश्चित बोलला असेल. जे झालं ते परवाच्या दिवशी पुरतंच होतं. बजरंग सोनवणे तुम्हाला आणि बसलेल्या तमाम जनतेला मी हा विश्वास देतो, शिवछत्र परिवार पाठीत मारण्याचे काम कधीही करणार नाही', असं अमरसिंह म्हणाले.

बीड : शिवछत्र परिवार पाठीत मारण्याचं काम कधीही करणार नाही, असं म्हणत माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी बजरंग सोनवणे यांना निवडणून आणण्याचे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही म्हणून नाराज असलेले अमरसिंह पंडित अखेर बजरंग सोनवणेंच्या प्रचारसभेत काल (रविवारी) सहभागी झाले होते. यावेळी अमरसिंह पंडित म्हणाले की, ' इतरांनी आमची काळजी करण्याची गरज नाही. माझा भाऊ भावनेच्या भरात निश्चित बोलला असेल. जे झालं ते परवाच्या दिवशी पुरतंच होतं. बजरंग सोनवणे तुम्हाला आणि बसलेल्या तमाम जनतेला मी हा विश्वास देतो, शिवछत्र परिवार पाठीत मारण्याचे काम कधीही करणार नाही', असं अमरसिंह म्हणाले. निवडणुकीत माझ्यासाठी जे करणार होतो, ते मी बजरंग सोनवणे यांच्यासाठी करेन. बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी उभारून त्यांना निवडून आणण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यामुळे सर्वांनी प्रचाराच्या कामाला लागावे, असे आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केले. बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित हे इच्छुक होते. त्यांना उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. मात्र आयत्यावेळी बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जि.प सदस्य बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली. सोनवणे यांना धनंजय मुंडे त्यामुळे अमरसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये नाराजी होती. अमरसिंह पंडित यांचे बंधू विजयसिंह पंडित यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली होती. पंडित यांचे समर्थक नाराज झाल्यामुळे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना गेवराईमध्ये होणारी बैठक रद्द करावी लागली होती. मात्र पक्षाला पंडित यांची नाराजी दूर करण्यामध्ये यश आले आहे. बजरंग सोनवणेंना उमेदवारी दिल्याने अमरसिंह पंडित समर्थकांमध्ये रोष, गेवराईत होणारी बैठक रद्द

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget