Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 20 जून 2021 रविवार  | ABP Majha


1. राज्यात शनिवारी 8,912 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 257 रुग्णांचा मृत्यू


2. लोकं जोड्यानं हाणतील, स्वबळाची भाषा करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी सुनावलं, शिवसेना भवनाबाहेर भाजपशी पंगा घेणाऱ्या कार्यकर्त्यांचंही कौतुक


3. उद्धव ठाकरेंचा टोला कुणाला उद्देशून याची स्पष्टता नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया


4. गर्दी न करण्याचं अजित पवारांचं आवाहन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच चिरडलं, पुण्यातल्या पक्षकार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी तोबा गर्दी


5. 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेचा मेगाप्लान, सुपर स्प्रेडर ठरू शकणाऱ्यांना प्राधान्य


 



6. लसीकरण मोहिमेंतर्गत तृतीयपंथीसाठी ठाणे महापालिकेचं लसीकरण पार, राज्यातील पहिलंच विशेष लसीकरण सत्र


7. नियमांचं पालन न केल्यास 6 ते 8 आठवड्यात तिसऱ्या लाटेचा धोका, एम्सचे संचालक डॉ. गुलेरियांचा इशारा


8. अयोध्येत आणखी एका जमीन घोटाळ्याचा आरोप, 20 लाखांची जमीन रामजन्मभूमी ट्रस्टला अडीच कोटींना विकल्याचा आरोप


9. साऊदम्प्टन कसोटीत कोहली आणि रहाणेनं सावरला भारताचा डाव;  भारताची 3 बाद 146 धावांची मजल


10. यवतमाळमधील गर्भवती वाघीण हत्याप्रकरणी 5 जणांना बेड्या, आरोपींच्या अटकेवेळी वनविभागाचा मोठा फौजफाटा