मुंबई : महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा केली जात आहे. शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र शासानाने एक मोठा निर्णय घेतला आहे. तरूण पिढीमध्ये देशभक्ती मनात देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य केले आहे. याची सुरूवात 1 फेब्रुवारीपासून म्हणजे आजपासून महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांची सुरूवात राष्ट्रगीताने होणार आहे.

उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले,   सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवसापासून सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य आहे. अधिसूचनेनुसार महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीताने कामकाज सुरू होईल. महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचा हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील शाळांमध्ये दिवसाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली आणि शाळा सुटण्यापूर्वी देखील सामुहिक राष्ट्रगीताने होते . परंतु आता महाराष्ट्र सरकारच्या नवीन अधिसूचनेनंतर महाविद्यालयांमध्ये देखील राष्ट्रगीताने सुरूवात होणार आहे.

नवी दिल्ली : चित्रपटगृहांमध्ये आता राष्ट्रगीत अनिवार्य नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय



शिवजयंतीनिमित्त राज्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी आहे. परंतु जी महाविद्यालये आज सुरू आहे त्यांची सुरूवात राष्ट्रगीताने झाली आहे. राष्ट्रगीताने दिवसाची सुरूवात ही प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी देखील हा एक सुखद अनुभव आहे.

महाराष्ट्र सरकार आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करणार आहे. मराठी भाषा अनिवार्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे लवकरच नवीन अधिसूचना येण्याची शक्यता आहे. राज्यातील मराठी शाळांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून याचे मुख्य कारण म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या शाळा आहे.

संबंधित बातम्या :

राष्ट्रगीत सुरु असताना नितीन गडकरींना भोवळ

चित्रपटगृहांमध्ये आता राष्ट्रगीत अनिवार्य नाही!