एक्स्प्लोर
Advertisement
कोल्हापूर, सांगलीकरांनो धीर धरा, तुमचं आयुष्य पूर्वीपेक्षा आनंदी आणि समृद्ध होईल : अक्षयकुमार
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरपरिस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे. लढणे आन पुढे जाणे हे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांकडून शिकलो आहोत.
मुंबई : कोल्हापूर, सांगलीकरांनो धीर धरा, तुमचं आयुष्य पूर्वीपेक्षा आनंदी आणि समृद्ध होईल, अशा शब्दात खिलाडी अक्षयकुमारने पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे. सरकार आणि कोल्हापूर डिजास्टर मॅनेजमेन्ट ग्रुप तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे. तुमचं शहर, तुमचं गाव पूर्वीपेक्षा आनंदी आणि समृद्ध होईल. केडीएमजी आणि मी आपल्या सोबत आहोत. अशा शब्दात अक्षयकुमारने एक व्हिडीओ प्रसिद्ध करून पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरपरिस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे. लढणे आणि पुढे जाणे हे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांकडून शिकलो आहोत. सरकार आणि कोल्हापूर डिजास्टर मॅनेजमेन्ट ग्रुप तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे. मला विश्वास आहे की, आपला जिल्हा, आपली गल्ली पहिल्यापेक्षाही सुंदर आणि आनंदी होईल. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे लाखो लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पुरामुळे सांगलीत 3 लाख 5 हजार 957 व्यक्ती स्थानांतरीत झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यात 104 गावे व महानगरपालिका क्षेत्र यामधून 64 हजार 646 कुटुंबे स्थानांतरीत झाली. त्यातील 3 लाख 5 हजार 957 व्यक्ती स्थानांतरीत झाल्या. यांची सोय 64 तात्पुरत्या निवारण केंद्रामधून करण्यात आली. तर जिल्ह्यात 26 लोकांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती बेपत्ता आहे. तर कोल्हापुरात 2 लाख 45 हजार 229 जणांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. या पुरामुळे सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यात एकूण 50 गाई, 42 म्हशी, 23 वासरं, 58 शेळ्या 11 हजार 100 कोंबड्यांचा मृत्यू झाला असून एकूण 25 लाख 17 हजार रुपयांचं नुकसान झालं आहे."Khiladi Akshay Kumar Aala Maharashtratlya Purgrasthansathi Dhaaun"
सरकार आणि कोल्हापूर डिजास्टर मॅनेजमेन्ट ग्रूप तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे.. तुमचं शहर, तुमचं गाव... पूर्वीपेक्षा आनंदी आणि समृद्ध होईल... केडीएमजी आणि मी आपल्या सोबत आहोत... धन्यवाद! - @akshaykumar pic.twitter.com/ayG3gujSNp — AKSHAY K Mumbai Fans (@MumbaiAkkians) August 16, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
क्राईम
Advertisement