अकोला : अकोला जिल्ह्यानं आता कोरोना अनलॉकच्या दिशेने पावलं टाकायला सुरूवात केली आहे. रूग्णाच्या संख्या वाढत असतांनाच जिल्हा प्रशासनानं काल 5 मार्चपासून कोरोनाचे निर्बंध शिथील केले आहेत. जिल्ह्यातील अकोल्यासह अकोट आणि मुर्तिजापूर या तिन्ही कोरोना हॉटस्पॉट ठरत असलेल्या शहरात हे निर्बंध लावण्यात आले होते. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या अनलॉकसंदर्भात नवे नियम जारी केले आहेत.

या नव्या आदेशानुसार आता प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या अकोला, मुर्तीजापूर व अकोट शहरांतील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत खुली राहतील. मात्र, पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन राहणार आहे.

असे आहेत 'अनलॉक'चे नवे नियम

  • सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन हे या कालावधीत बंद राहतील.
  • कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे, अशाच दुकानदारांना दुकाने खुली ठेवण्याची मुभा. सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत खुली ठेवण्याची परवानगी आहे.
  • हाॅटेल मधून सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत पार्सलच मिळेल
  • सर्व पेट्रोलपंप हे पाच वाजेपर्यंत खुले. त्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी पाच पेट्रोलपंप रात्री 9 पर्यंत उघडे राहतील.
  • लग्नासाठी नवरी-नवरदेवासह 25 वऱ्हाडी ही अट कायम.
  • ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याकरता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे, ते सर्व उद्योग सुरू ठेवण्याकरिता परवानगी राहील.
  • सर्व प्रकारची शासकीय कार्यालये, बँका 15 टक्के किंवा 15 व्यक्ती यांपैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरू राहतील.
  • सर्व धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद राहतील. सर्व प्रकारच्या शैक्षणीक संस्था बंद राहतील.
  • सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे ही बंद राहतील.

मार्च महिन्यातील पहिल्या पाच दिवसांतील कोरोना रूग्ण आणि मृत्यू

दिनांक   रूग्ण मृत्यू
1 मार्च   463 o3
2 मार्च     407 02
3 मार्च      431 02
4 मार्च      479 04
5 मार्च  464 03
विदर्भात कोरोनाचा कहर, कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढण्याला का कारणं? स्पेशल रिपोर्ट