पुणे : नवरा बायकोची भांडणं काही नवी नाहीत. ती अगदी कुठल्याही मुद्द्यांवर होऊ शकतात. नवरा बायकोमध्ये टिपिकली भांडणं होतच असतात. त्यात नवरा वेळ देत नाही, गिफ्ट देत नाही, एखादा स्पेशल दिवस जसे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस विसरला म्हणून वादविवाद होत असतात. पण पुणे पोलिसांकडे आलंय एक असे अजब भांडण आलं आहे. यामध्ये बायकोनं पतीदेव व्हॉट्सअॅपला माझा डीपी ठेवत नाहीत, अशी तक्रार केली आहे.


पुणे पोलिसांच्या भरोसा सेलकडे असं एक प्रकरण आलं आहे. कौटुंबिक तंटे सोडवण्यासाठी भरोसा सेलमध्ये समुपदेशन केले जाते. घरगुती भांडणं कायद्याच्या कक्षेत येण्यापूर्वीच समंजसपणे सोडवण्याचं काम भरोसा सेल मध्ये केलं जातं. मागील काही दिवसापासून सोशल मीडियामुळे होणारी भांडणं भरोसा सेल मध्ये येण्याचं प्रमाण वाढलंय. त्यातलंच हे उदाहरण. नवरा-बायको दोघेही उच्चशिक्षित आहेत. बायकोला वडील नसल्यामुळे नवरा तिच्या आईची बहिणीची काळजी घेतोय, हे सगळं असलं तरी त्यांच्यात वाद होते कारण नवरा त्याच्या व्हॉट्सअॅपला तिचा डीपी ठेवत नाही. अखेर भरोसा सेलमध्ये दोघेजण आले, तिथल्या पोलिसांनी त्यांची समजूत घातली आणि हे भांडण मिटलं.


पण अशीच भांडण सध्या अनेक ठिकाणी होताना दिसतात. याच मुद्द्यावर आम्ही काही तरुणांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. बायकोचा फोटो डीपीवर ठेवायला हरकत काय. महिला एवढ्या नटून-थटून तयार होतात आणि त्यांचा फोटो ठेवला नाही तर ते नाराज होतात हे साहजिक आहे. लग्न केलं प्रेम करता तर लपवता का असं काही लोकांचं म्हणणं होतं.

सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र. काहीवेळा उपयोगी येतं तर काही वेळा उलटतं सुद्धा. पण आता हा सोशल मीडिया नवरा बायको मधल्या दुराव्याचे ही कारण ठेवू शकतो हे देखील समोर यायला लागलंय.