अकोला : स्वतःच्याच सरकारविरोधात आंदोलन करण्यासाठी दिल्लीहून अकोला गाठणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी यशवंत सिन्हांनी अकोल्यात दोन ते तीन तास ठिय्या आंदोलन केलं.


मागण्यांच्या पूर्ततेसाठी यशवंत सिन्हांनी अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांवर समाधानी नसल्याचं सांगत यशवंत सिन्हांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे सिन्हा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर यशवंत सिन्हा यांनी भाजप सरकारविरोधात आवाज उठवला होता. बोंडअळीग्रस्त कपाशीचं पीक घेऊन यशवंत सिन्हा यांनी आंदोलन केलं.

दरम्यान यशवंत सिन्हांच्या आंदोलनादरम्यान भाजप खासदार नाना पटोले आणि आमदार बच्चू कडू यांनी गैरहजेरी लावल्यानं त्याचीही चर्चा सुरु आहे.