सोलापूर : सोलापुरात जेवणाऱ्या ताटावरच पतीने पत्नी आणि मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीक्ष्ण हत्याराने वार करुन 35 वर्षीय पती संजय नागप्पा कोरे याने पत्नी आणि मुलीला संपवलं.


सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यामधल्या सिद्धनकेरी गावात हा प्रकार घडला. रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मुलगी श्रावणी आणि पत्नी सुरेखा जेवत होत्या. त्यावेळी संजय कोरे याने तीक्ष्ण हत्याराने मायलेकीचा खून केला.

गावातील तरुणांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी संशयित आरोपी  संजय कोरेला अटक केली. हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.