एक्स्प्लोर

अकोल्यात भाजपमधील धोत्रे-पाटील वाद विकोपाला

अकोला भाजपमधील राजकारण हे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील दोन व्यक्तींच्या भोवती फिरतं. परंतु या दोघांमधला वाद आता विकोलापाला जाऊ लागला आहे.

अकोला : मतदान संपल्यानंतरही अकोल्यात भाजपातील भांडणं थांबलेली नाहीत. काल संध्याकाळी भाजपने अकोला महापालिकेतील पक्षाचे नगरसेवक आशिष पवित्रकार यांना पक्षविरोधी कारवायांसाठी निलंबित केले आहे. यासोबतच पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य आणि भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय लहानेंचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. हकालपट्टी करण्यात आलेले दोन्ही पदाधिकारी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे समर्थक आहेत. अकोला जिल्हा भाजपात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे दोन गट आहेत. दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी सोडत नाहीत. राज्यात भाजपमध्ये गडकरी-फडणवीस यांच्यातल्या सुप्त संघर्षाचे पडसाद अकोला भाजपातही पहायला मिळत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे हे गडकरींचे कट्टर समर्थक आहेत. तर गृहराज्यमंत्री रणजीत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत. 'पार्टी विथ डिफरन्स'चा दावा करणारा भाजप अकोल्यात 'पार्टी विथ डिफरन्सेस' झाली आहे. जिल्हा भाजप केंद्रीय राज्यमंत्री, स्थानिक खासदार संजय धोत्रे आणि पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या गटात दुभंगली आहे. गेल्या पाच वर्षांपासून दोन्ही गट एकमेकांना नामोहरम करण्याची एकही संधी सोडत नाहीत. भाजप पक्षसंघटना, महापालिका आणि अकोट, मुर्तिजापूर आणि तेल्हारा नगरपालिका धोत्रे गटाच्या ताब्यात आहेत. मात्र, अनेक जिल्हा शासकीय समित्यांवर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या समर्थकांचं वर्चस्व आहे. धोत्रे केंद्रात राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी रणजीत पाटलांचं जिल्ह्यातलं प्रशासकीय वलय कमी करण्यात यश मिळवलं आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपचे चारही उमेदवार धोत्रे समर्थक आहेत. मुर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळेंना आपल्या गटात आणत धोत्रेंनी रणजीत पाटील यांचा एकमेव समर्थक आमदार फोडला. याच हरीश पिंपळेंनी धोत्रेंच्या उपस्थितीत विधानसभेच्या एका सभेत रणजीत पाटील यांच्यावर कमरेखालची टिका केली होती. यामुळे पाटील समर्थकांनी मुर्तिजापूर मतदारसंघात पिंपळेंच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती. यामध्ये अकोला महापालिकेतील नगरसेवक आशिष पवित्रकार आणि जिल्हा परिषद सदस्य अक्षय लहाने यांचा सहभाग असल्याची लेखी तक्रार हरीश पिंपळेंनी पक्षाकडे केली होती. पिंपळेंच्या तक्रारीवरून काल मतदान संपल्यावर लगेच आशिष पवित्रकार आणि अक्षय लहानेंची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. हकालपट्टी करण्यात आलेले नगरसेवक आशिष पवित्रकार हे डॉ. रणजीत पाटील यांचे चुलतभाऊ आहेत. तर जिल्हा परिषद सदस्य अक्षय लहाने हे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिवही आहेत. अक्षय लहाने हे जनसंघाचे दिवंगत माजी प्रदेशाध्यक्ष, माजी खासदार भाऊसाहेब लहाने यांचे नातू आहेत. विधानसभा निवडणुकीत धोत्रे गटाने पालकमंत्री रणजीत पाटील यांना पक्षाचे बॅनर, होर्डिंग्जसह प्रचारातूनही पूर्णपणे बेदखल केलं होतं. त्यामूळे विधानसभेच्या निकालाआधीच अकोला भाजपमधील पेटलेला हा संघर्ष पुढच्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Mumbai Crime News: आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Amol Kolhe On Savitribai Jyotiba Phule Serial: TV वरुन गाशा गुंडाळला, पण युट्यूबर येताच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं; 'सावित्रीबाई जोतीराव फुले'बाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
'टीआरपीपेक्षा प्रेक्षकांचं प्रेम महत्त्वाचं...'; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Embed widget