एक्स्प्लोर

Ajit Pawar : चंद्रकांत पाटलाचं आई-वडिलासंदर्भातलं वक्तव्य म्हणजे 'विनाशकाले विपरीत बुद्धी'; अजित पवारांची टीका

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आई-वडिलांवरील वक्तव्य म्हणजे  विनाशकाले विपरीत बुद्धी आहे, असं विरोधीपक्षनेते अजित पवारांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar :  पुण्याचे (Pune) पालकमंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant Patil) यांनी केलेलं आई-वडिलांवरील वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे, अशी टीका विरोधीपक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) केली आहे. आई-वडिलांना शिव्या द्या मात्र मोदी-शहांना शिव्या काहीही म्हणू नका, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलं होतं, त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांबरोबर शहरातील विविध समस्यांवर बैठक घेतली, त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

चंद्रकांत पाटलांसारख्या महत्वाच्या पदावर असलेल्या मंत्र्यांनी अशा प्रकरची वक्तव्यं करु नये. त्यांना यंदा कमी दर्जाचं मंत्रिपद मिळालं आहे म्हणून कदाचित ते नाराज असतील,असा टोला देखील त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. महाराष्ट्रात नाही तर कुठेच कोणी कोणाला शिव्या देऊ नये. शिव्या देऊन नोकरी लागणार नाही आणि महागाईदेखील कमी होणार नाही आहे. त्यांच्यात काही सुसंस्कृतपणा आहे की नाही?, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. 

'नाशिकचा अपघात भीषण '
नाशिकमध्ये झालेला अपघात भीषण आहे. त्यासंदर्भात सगळी माहिती घेत मी ट्वीटदेखील केलं आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांनी देखील अपघाताच्या स्थळाला भेट देऊन पाहाणी केली आहे.12 लोक मृत्युमुखी पडले आहेत. ही बाब महाराष्ट्रासाठी दुख:द आहे, असे विचित्र अपघात होतात, दोष कुणाला द्यायचा हे समजत नाही. मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी नाशिकच्या अपघातावर दिली आहे. 

शिवसेनेसाठी एकट्या बाळासाहेब ठाकरे यांचा योगदान: अजित पवार
बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली ही शिवसेना आहे. मला जशी साथ दिली तसं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना संभाळून घ्या, असं बाळासाहेब ठाकरे यांनी हयात असताना सांगितलं होतं. शिवसेनेसाठी एकट्या बाळासाहेब ठाकरे यांचा योगदान आहे. महाराष्ट्रातील प्रमुख चार पक्षांपैकी शिवसेना एक पक्ष आहे. त्यामुळे चिन्हाबाबत निर्णय देताना निवडणूक आयोगाने हा विचार करावा, त्यानंतर त्यांनी निर्णय द्यावा, अशी भूमिका अजित पवारांनी शिवसेनेच्या सुरु असलेल्या चिन्हाच्या वादावर स्पष्ट केली आहे. 

शिंदे-फडणवीस सरकारकडून दुसरी अपेक्षा काय?

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणातील एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर परत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावर अजित पवारांनी टीका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून दुसरी कोणती अपेक्षा असणार आहे, असं देखील ते म्हणाले. 
 
'महापालिकेच्या निवडणुका मुद्दाम लांबवत आहेत'
राज्य सरकार सद्यस्थितीत महापालिका निवडणूक घेण्याच्या मूडमध्ये नाही. राज्य सरकारला या निवडणुका लांबणीवर टाकायच्या आहेत. पोट निवडणूक लावू शकता मग महापालिकेच्या निवडणुका का लावत नाही , असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. 

संबंधित बातम्या-

'आईवडिलांना शिव्या द्या चालेल, पण मोदी-शाहांना शिव्या देणं सहन करणार नाही'; चंद्रकांत दादांचं वक्तव्य, रोहित पवार म्हणाले.... 

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget