Ajit Pawar: गेल्या काही दिवसांपासून जास्त शक्यता वर्तवली जात होत्या त्या आज त्या पूर्णत्वास जातात की काय? अशी परिस्थिती राज्याच्या राजकारणात आज (2 जुलै) निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थ असलेल्या अजित पवार आजच राष्ट्रवादीला हादरा देणार का अशीही स्थिती आहे. आज सकाळपासून राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी सुरु होती. या बैठकीनंतर अजित पवार काही आमदारांसह राजकारणाचे दिशेने जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यामुळे आजच शपथविधी होऊन काही मंत्री शपथ घेणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे.


अजित पवार यांच्याकडून हालचाली सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सोबत भाजपचे मंत्री राजभवनात दाखल झाले आहेत. त्यामुळे एकंदरीत आता अजित पवार हे स्वतंत्र गट घेऊन भाजपमध्ये सामील होणार की अन्य कोणती राजकीय घडामोड घडणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार अनेक विषयांमुळे चर्चेत आहेत. त्याचबरोबर काही वेळापूर्वीच शरद पवार यांनी शक्यता खोडून काढली होती. मात्र, आता थेट अजित पवार राजभवनाच्या दिशेने गेल्याने आजच राजकारणामध्ये मोठीच एखादी घडामोडी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार 28 आमदारांसह अजित पवार हे भाजपमध्ये सामील होणार असल्याचे म्हटले जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या