एक्स्प्लोर

अजित पवारांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी

पक्षाच्या विरोधात जाऊन भाजपला पाठिंबा देणाऱ्या अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. यासंदर्भातील सर्व अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सुरु असलेली बैठक नुकतीच संपली आहे. या बैठकीत पक्षाने बंडखोर आमदार अजित पवार यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या विरोधात जाऊन भाजपला पाठिंबा देणाऱ्या अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. यासंदर्भातील सर्व अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदावर नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्यांनी बंडखोरी केल्यामुळे या पदावरुन त्यांना हटवले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा दिलीप वळसे पाटील यांची निवड होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून हाय व्होल्टेज ड्रामा सुरु आहे. हा ड्रामा सुरु असताना आज राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. कोणालाही कल्पना नसताना आज सकाळी भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे गुपचूप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, सत्तेसाठी कुटुंबात फाटाफूट नको, तू काहीही कर, पण उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे, असे भावनिक आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे मोठे बंधू अजित पवार यांना केले आहे. अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केल्यामुळे पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आपल्या कुटुंबाचा आत्तापर्यंतचा प्रवास महाराष्ट्राला माहिती आहे. सत्तेच्या खेळासाठी आपल्या कुटुंबात फूट पडायला नको. तुला जे हवे आहे त्यावर आपण चर्चा करु, त्यावर तोडगा काढू. तू पहिल्यांदा राजीनामा दे आणि परत ये, असे भावनिक आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. मात्र, यावर अजित पवारांनी कोणती प्रतिक्रिया दिली हे समजू शकले नाही. "काहीही कर, उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे - सुप्रिया सुळे | ABP Majha अजित पवारांच्या भूमिकेला कधीही पाठिंबा देणार नाही- शरद पवार | ABP Majha व्हिडीओ पाहा : कालपासून बेपत्ता असलेले धनंजय मुंडे परतले "पवार कुटुंबात उभी फूट", पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाणी | ABP Majha बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया कशी पार पडेल? माजी विधीमंडळ सचिव अनंत कळसेंचं विश्लेषण 'त्या' निर्णयात शरद पवारही सामील; नवनीत कौर राणांचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget