पुणे : बारामतीमधील एका भाजी विक्रेत्याचा गुरुवारी पहाटे कोरोनामुळे मृत्यू झाला. हा मुस्लिमधर्मीय भाजीविक्रेता गेल्या काही महिन्यांपासून अर्धांगवायूनेही आजारी होता. मात्र या भाजी विक्रेत्याच्या मृत्यूनंतर बारामतीमध्ये भीलवाडा पॅटर्न राबवण्याचा निर्णय अजित पवारांच्या सूचनेनंतर घेण्यात आला. एवढंच नाही तर मृत्यू झालेल्या या मुस्लीमधर्मीय भाजी विक्रेत्याच्या अंत्यविधीला गर्दी होऊ नये यासाठी आवाहन करण्याची सूचना मृत व्यक्तीच्या मुलालाचं करण्यात आली. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या प्रकरणात लक्ष घातलं. त्यामुळं मृत व्यक्तीच्या मुलाने नातेवाईकांना घरीच राहून श्रद्धांजली वाहण्याचं आणि प्रत्येकाने घरीच नमाज पाडण्याचं आवाहन केलं.


या आवाहनाला मृताच्या नातेवाईकांनाही प्रतिसाद दिला. त्यामुळं बारामतीतील या भाजी विक्रेत्याचा पुण्यातच अंत्यविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे शासकीय अधिकऱ्यानी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा अंत्यसंस्कार करण्यासाठी जे नियम आहेत त्या नियमांनुसार पुण्यातच या रुग्णावर अंत्यसंस्कार केले. या भाजी विक्रेत्याच्या मुलगा, सून आणि नातीलाही कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर देखील पुण्यात उपचार सुरु आहेत . तिघांचीही प्रकृती व्यवस्थित आहे .मात्र या तणावाच्या वातावरणात देखील मृत व्यक्तीच्या मुलाने त्याच्या वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी शासकीय यंत्रणेला केलेल्या सहकार्यचं डॉक्टरांनीही कौतुक केलंय .


या भाजी विक्रेत्याच्या मृत्यूनंतर बारामतीती राजस्थानमधील भिलवाडा पॅटर्न राबवण्याचा निर्णय अजित पवारांच्या सूचनेनंतर घेण्यात आला आहे. त्यासाठी संपूर्ण बारामती शहर सील करण्यात आलंय. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी देखील लोकांनी बाहेर येण्याची गरज नाही असं प्रशासनाने नमूद केलंय. भाजीपाला आणि इतर आवश्यक वस्तू नागरिकांना त्यांच्या परिसरात उपलब्ध करून देण्यात येतील असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. राजस्थानमधील भिलवाडामध्ये खाजगी हॉस्पिटलमधील 17 डॉक्टर्सना कोरोना झाल्याचं उघड झाल्यानंतर देशात खळबळ उडाली होती. परंतु त्यानंतर तिथल्या प्रशासनाने उचललेल्या कडक पावलांमुळे आणि लोकांनी त्याला दिलेल्या प्रयत्नांमुळे भिलवाडा पॅटर्न हा संपूर्ण देशात कौतुकाचा विषय बनलाय आणि अनेक ठिकाणी त्याच अनुकरण करण्याचा प्रयत्न होतोय.


Rajendra Bhatt on Bhilwara pattern | काय आहे भिलवाडा पॅटर्न? संकटातील आशेचा किरण



या पॅटर्ननुसार दहा लाख लोकसंख्येच्या या भिलवाडा शहरातील आणि चोवीस लाख लोकसंख्येच्या भिलवाडा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचं स्क्रीनिंग करण्यात आलं. ज्यांना कोरोनाची लक्षण दिसली किंवा अंगात ताप असेल अशांना तात्काळ वेगळं करण्यात आलं. त्याचबरोबर संपूर्ण भिलवाडा जिल्ह्यात तात्काळ कर्फ्यू लागू करण्यात आला. त्यानंतर भिलवाडा प्रशासनाने केलेली तिसरी गोष्ट म्हणेज कोणत्या ट्रेसिंग करण्यात आलं. म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ज्यांना भेटले होते अशांना शोधून त्यांना कॉरेन्टाईंन करण्यात आलं. त्यामुळं भिलवाडामधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीसच्याही आत राहिली. बारामतीतही हाच भीलवाडा पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .


संबंधित बातम्या :