मुंबई : काहीजण खड्ड्याजवळ जातात आणि सेल्फी काढतात, पण मला असली नौटंकी आवडत नाही, असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) टोला लगावला. सुप्रिया सुळे यांनी आजच अजित पवारांच्या कामाचे कौतुक केले होते. मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या कामाची पद्धत हेरली असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला होता. मुंबई राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अजित पवार बोलत होते.
मुंबईत पक्ष ज्या गतिने वाढणे गरजेचं होतं ते झालं नव्हतं. आम्ही देखील याला जबाबदार आहोत. गृह खातं आपल्याकडे होतं परंतु अमच ग्रामीण भागात लक्ष होतं. आता शहरात लक्ष द्यायचं आहे. बहुजनांना सोबत घेऊन जायचं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं. आपल्याकडे वेळ कमी आहे. सुरुवात चांगली झाली आहे. हलक्या कानाचे कुणी राहता कामे नये. ज्यांना पद दिलं आहे त्यांची प्रतिमा जनसामन्यात चांगली राहण्याचा सल्ला देखील अजित पवारांनी दिलाय.
आपल्याला कोणावर टीका करायची नाही - अजित पवार
आपल्याला कुणावर टीका करायची नाही त्यांना त्यांचा लक लाभ. धारावीचा प्रकल्प हाती घेण्यात आलं आहे. काहीजण सध्या त्या प्रकल्पाबाबत संभ्रम करतं आहेत. प्रश्न सोडवायची धमक आणि ताकद आपल्यात आहे. आपण रेडिओ क्लब जवळ एक जेट्टी तयार करणार आहोत. 250 कोटी रुपये आपण तिथं मंजूर केलेत. उद्याची 50 वर्ष लक्षत घेतं आम्ही आता काम करत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.
आता आपल्याकडे वेळ कमी, कामाला लागा - अजित पवार
आम्ही 3 ते 4 दिवस मुंबईत असतो , त्यावेळी आपण प्रश्न सोडवूयात. बूथवायज नोदणी असली पाहिजे. दर मंगळवारी देवगिरी निवासस्थानी बैठक आम्ही घेत असतो. सर्व आमदार उपस्थित असतात. मुंबईच्या प्रश्नासाठी समीर भुजबळ देखील उपस्थित राहिला हवेत. आता आपल्याकडे वेळ कमी आहे. इथून बाहेर पडणाऱ्या कार्यकर्त्याने कमीत कमी 500 ते 700 मतदान गोळा करायचं आहे. ग्रामीण भागाचा पक्ष ऍशी आपली प्रतिमा आहे याचा अर्थ असा अजिबात नाही की शहरात आपण कमी पडायचं नाही, असा आवाहन देखील अजित पवारांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केलं आहे.
निवडणुकीत आपण काम करायचं आहे - अजित पवार
विधानसभा लोकसभा आणि महानगरपलिका निवडणुकीत आपण काम करणार आहोत. आपल्या आपल्या भागात निवडून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहायला हवं. वंचित आघाडीसाठी आपण काय करतोय ते आपल्याला दाखवून द्यायचं आहे. तीन पक्षांची विचारधारा वेगळी असली तरी जगात नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता मोठी आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं.