एक्स्प्लोर

अजित पवार गटाकडून कायदेशीर लढाईची तयारी; प्रत्येक जिल्ह्यात शपथपत्र घेण्याची मोहीम सुरु

Osmanabad : एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यात 5 हजार शपथपत्र देण्यात आली असून,  त्यातली 3 हजार शपथपत्र भरून घेण्यात आली आहे.

उस्मानाबाद : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून आपापल्या कार्यकर्त्यांकडून शपथपत्र घेण्यात आले होते. दरम्यान, पुढे निवडणूक आयोगात हे शपथपत्र दाखल करण्यात आले होते. तर, आता राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून देखील राज्यभरात आपापल्या कार्यकर्त्यांकडून शपथपत्र भरुन घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशी मोहीम राबवली जात आहे. यासाठी स्थानिक महत्वाच्या नेत्यांकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यात 5 हजार शपथपत्र देण्यात आली असून,  त्यातली 3 हजार शपथपत्र भरुन घेण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये शपथपत्र भरण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. 

राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. विशेष म्हणजे राजकीय मैदानात असलेली ही लढाई आता कायदेशीर लढाईपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षातील कार्यकर्ते आपल्याच ताब्यात असल्याचे कायदेशीररित्या स्पष्ट करण्यासाठी अजित पवार गटाकडून तयारी करण्यात येत आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांकडून शपथपत्र भरुन घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तर, उस्मानाबाद जिल्ह्यात मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये या मोहिमेची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी कायदेशीर लढाईची तयारीसाठी अजित पवार गट तयारी करत असल्याची चर्चा आहे. 

शिवसेनेच्या बंडखोरीचा 'अभ्यास'

ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंडखोरी केली, त्याचप्रमाणे अजित पवारांनी देखील आपल्या सहकारी आमदारांना सोबत घेऊन बंडाचा झेंडा फडकवला. दरम्यान, शिवसेनेमधील बंडखोरीचा मुद्दा न्यायालय आणि निवडणुका आयोगापर्यंत गेल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षातील बंडखोरी देखील निवडणुका आयोगापर्यंत पोहोचली आहे. मात्र, शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगात सादर करण्यात आलेले कागदपत्रे आणि त्यांच्याकडून झालेल्या चुका या सर्वांचा 'अभ्यास' राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून केला जात आहे. त्या चुका टाळण्याचे प्रयत्न देखील करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून कार्यकर्त्यांचे शपथपत्र भरुन घेण्यात येत आहे. 

शरद पवारांच्या सभेला अजित पवारांच्या सभेतून उत्तर? 

राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार हे अजित पवार गटाच्या महत्वाच्या नेत्यांच्या जिल्ह्यात सभा घेत आहेत. यापूर्वी त्यांनी छगन भुजबळ यांच्या नाशिक आणि धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात सभा घेतल्या होत्या. त्यामुळे आता अजित पवारांकडून देखील शरद पवारांनी सभा घेतलेल्या जिल्ह्यात सभा घेण्यात येत आहे. आज बीड जिल्ह्यात अजित पवारांची सभा होत असून, लवकरच कोल्हापूरमध्ये देखील अजित पवारांची सभा होणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Ajit Pawar : मी सत्तेसाठी हापापलेला कार्यकर्ता नाही, पदाचा वापर बारामतीकरांसाठी करणार; अजित पवारांचे बारामतीत जोरदार शक्तिप्रदर्शन

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस, 17 सप्टेंबरनंतर कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय बघा: संजय राऊत
नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस, 17 सप्टेंबरनंतर कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय बघा: संजय राऊत
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Devendra Fadnavis in Nagpur: देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या तरुणीचा पुनर्विवाह, कोरोनामुळे जोडीदार गमावलेल्या तरुणीच्या आयुष्यात नवी पहाट
देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या तरुणीचा पुनर्विवाह, कोरोनामुळे जोडीदार गमावलेल्या तरुणीच्या आयुष्यात नवी पहाट

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Embed widget