मुंबई : एकीकडे शरद पवारांच्या (Sharad Pawar) राज्यभरात सभा होत आहेत तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून संघटनात्मक बांधणीवर भर दिला जातोय. अजित पवार गटाने आपल्या नऊ मंत्र्यांवर राज्यभरातील विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये नवे कार्यकर्ते पक्षात घेणे, विद्यमान नेते आणि पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन करणे अशा जबाबदाऱ्या असणार आहेत.


महत्त्वाचं म्हणजे मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, रायगड या भागांमध्ये पक्ष वाढवणं हे मोठं आव्हान असणार आहे. कारण या सर्व जिल्ह्यांमध्ये भाजप, शिवसेना आणि ठाकरे गटाचा चांगलाच प्रभाव आहे. अजित पवारांवर पुणे, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांची जबाबदारी आहे. तर कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती आणि नागपूरची जबाबदारी देण्यात आली आहे. 


कोणावर कोणती जबाबदारी?



27 ऑगस्टला बीडमध्ये अजित पवारांची उत्तरसभा


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2 जुलैला फूट पडली आणि त्यानंतर 5 जुलैला अजित पवार यांनी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना जिथे सभा घ्याल, तिथे उत्तर देणार, वय झालं, हट्ट सोडा अशा शब्दात शरद पवार यांना उत्तर सभा घेण्याचा इशारा दिला.  आता लवकरच अजित पवार यांची उत्तर सभा पार पडणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या बीड जिल्ह्यात सभा पार पडली आणि या सभेनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील शरद पवार यांच्या आरोपांना उत्तर देणारी जाहीर सभा 27 ऑगस्टला बीड मध्ये पार पडणार आहे. यासभेसाठी ताकदीने मैदानात उतरण्याचा चंग धनंजय मुंडे यांनी बांधला आहे. 


एकीकडे शरद पवारांच्या सभा होत असताना अजित पवार गटाकडून उत्तर सभा तर पार पडणारच आहेत यासोबतचं राज्यभरातील मतदार जोडण्यासाठी वेगवेगळ्या सेलच्या माध्यमातून आयोजन करण्यात येणार आहे. एकंदरीतच शरद पवार यांनी भाजप सोबत येण्यास नकार दिल्यामुळे आगामी काळात शरद पवार विरुद्ध अजित पवार हा संघर्ष मोठ्या प्रमाणात राज्याला पाहिला मिळण्याची शक्यता आहे. याचीच चुणूक सध्या राज्यभरात पार पडणाऱ्या शरद पवारांच्या सभा आणि त्यानंतर अजित पवारांच्या उत्तर सभातून पाहायला मिळणार आहे.


हे ही वाचा:


 नाशिकमध्ये शरद पवार गटाने एका रात्रीत उभारलं 'राष्ट्रवादी भवन', अजित पवार गटाच्या शेजारीच नवं कार्यालय