Amravati News अमरावती : आज कित्येक लोकांना शेतीमधलं काही माहिती नाही आणि ते शेतकर्‍यांच्या बाता मारताय. मी शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलोय,  त्यामुळे मला शेतकर्‍यांच्या वेदना माहित आहेत. सगळे सोंग करता येतात. मात्र, पैशाचे सोंग करता येत नाही. आपण सरकारमध्ये असल्याने आपण हे प्रत्यक्ष पैसे देऊन दाखवून दिलेले आहे. महिला व बाल रुग्णालयासाठी बारा कोटी रुपयांची सहा एकर जमीन दान देणाऱ्या विजय वडास्कार यांचे मी अभिनंदन करतो.  मी तुमच्या मतदारसंघात 4000 कोटीचा निधी दिलाय. त्यामुळे पुन्हा देवेंद्र भुयार यांना संधी द्या. वरुड मोर्शी मतदारसंघात अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, हा अजित पवारांचा (Ajit Pawar) शब्द आहे.


मी ताकाला जायचं आणि भांडे लपवायचं असं माझं धोरण नाही, मी काय सांधु संत नाही, हाडामासाचा माणूस आहे. आता मेहरबानी करा, सगळीकडे देशात विकासाचे काम सुरू आहेत, सोयाबीनला, कापसाला भाव चांगला द्यायचा आहे. त्यामुळे पुन्हा महायुतीचं सरकार निवडूण आणा, सरकारने घोषणा केलेल्या सगळ्या भावंडाच्या, माय माऊलीच्या, बहिणींच्या योजना चालू राहील असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अमरावतीकरांना (Amravati News) आवाहन केलं आहे.   


मागच्या वीज बिलाची चिंता करू नका, ते वीज बिल माझ्यावर सोडा- अजित पवार


लोकसभेच्या निवडणुकीत घटना बदलणार, संविधान बदलणार, असा अपप्रचार करण्यात आला. त्याला मागासवर्गीय अल्पसंख्यांक समाज बळी पडला. फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्रात मुली आत्महत्या करत असेल तर या अर्थमंत्री पदाला काय चाटायचे आहे. सत्ता येत राहील, जाता राहील. माणूस जगला पाहिजे मुलगी शिकली पाहिजे. म्हणून सर्व मुलींची फीस भरण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.आम्ही केवळ लाडकी बहीण योजनेवरच थांबलो नाही तर, ज्या गरीब मुली  शिकू शकत नाही, त्यांनी 50% शुल्क भरू शकत नसल्याने काही मुलींनी आत्महत्या केलीय आणि विरोधक ओरडतात की सरकारने नको त्या योजना आणल्या.


विरोधक लाडकी बहीण योजनेवरून टिंगल करायला लागलेत, भावासाठी काय आणणार? 44 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. इथूनपुढे शेतकऱ्यांना कृषी पंपाचे बिल भरावे लागणार नाही. मागच्या वीज बिलाची चिंता करू नका, ते वीज बिल माझ्यावर सोडून द्या. असे आश्वासन देत अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.


तुम्ही राखी बांधली, तुमच्या विश्वासाल तडा जाऊ देणार नाही- अजित पवार


नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली, तुम्हाला योग्य वाटलं त्यांना तुम्ही मते दिली. मात्र, तुम्ही देवेंद्र भुयार यांना निवडणून दिल आणि उद्धव ठाकरे यांच सरकार आलं, आणि आमदार देवेंद्र भुयार यांनी  माझ्या बरोबर राहायचं ठरवलं. आतापर्यंत या विभागातील पाच  वर्षाच्या आधी किती काम झाली हे तपासा आणि आता या पाच वर्षात  4371 कोटी रुपयांचा विकास या मतदारसंघात झालंय ते तपासा. मला या मतदार संघातील महिलांनी राखी बांधली  त्यामुळे तुमच्या विश्वासाल तडा जाऊ देणार नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना दिला आहे. 


हे ही वाचा