Ajit Pawar: कधी बुक्की तर कधी डोळा मारणारे दादा आता मविआला धक्का देण्याच्या तयारीत आहेत का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केल्यानं चर्चेला उधाण आले आहे. काल रात्री उशिरा अजित पवार कामोठेमधील एमजीएम रुग्णालयात श्री सेवकांची विचारपूस करण्यासाठी गेले होते. तिथून पुण्याला न जाता अजितदादा आपल्या मुंबईतल्या निवासस्थानी गेल आहेत
अजित पवार मुंबईत देवगिरीला आहेत. उष्माघाताचा उपचार घेत असलेल्यांची भेट घेऊन ते रात्री तीन वाजता घरी पोहचले. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील सासवड येथील शेतकरी मेळाव्याला देखील अजित पवार गेले नाहीत. त्याआधी वडकी, दिवे, भिवरी, बनपुरी या गावांमध्ये त्यांचे कार्यक्रम होणार होते. मात्र अजित पवारांचे आजचे वडकी, दिवे, भिवरी, बनपुरी या गावातील कार्यक्रम रद्द झाले आहेत.सासवडमधील कार्यक्रमास देखील ते उपस्थित राहण्याची शक्यता नाही. अजित पवारांच्या अनुपस्थितीत शरद पवार आणि सुप्रिया सुळे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. अजित पवार अद्यापही मुंबईत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
असा होता अजित पवारांचा पुणे दौरा?
- सकाळी 9.30 वाजता- जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन- अविनाश कैलास मोडक, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस वडकी व शिलाताई अविनाश मोडक
- सकाळी 9.45 वाजता- उपसरपंच, वडकी दिवे (श्री कातोबा हायस्कूल) येथे आगमन स्वागत पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी दिवे येथून मोटार सायकल रॅली
- सकाळी 10.15 वाजता- मौजे वनपुरी येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन व नळ पाणी पुरवठा योजना भूमीपूजन
- सकाळी 10.45 वाजता - मौजे भिवरी, जिल्हा परिषद पुणे साठवण बंधारा (पठारवाडी) भूमिपूजन पुणे सासवड रस्ता ते पुणे सातारा हायवे (एनएच-4) जोड रस्ता पठार वाडी (भिवरी) ते गोगलवाडी मार्गे / तालुका जोड रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन, हॉटेल आमराई 69 रिसॉर्ट उद्घाटन
- सकाळी 11.20 वाजता- वाघीरे महाविद्यालय (राखीव)
- सकाळी 11.30 वाजता- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी व युवक मेळावा सासवड (पालखी तळ मैदान)
- दुपारी 2.30 ते 3.30 - राखीव
अजित पवार भाजपात जाणार?
काही दिवसांपूर्वी अजित पवार ताफा सोडून खासगी गाडीत बसून गायब झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी मी कुठेही गायब झालो नव्हतो. माझी तब्येत ठीक नव्हती, पित्ताचा त्रास झाला होता, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर अजित पवारांबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवण्यात आले. पहाटेच्या शपथविधीपासून ते आता पुन्हा मध्येच गायब झाल्याने चर्चा रंगली होती. त्यासोबत मोदींच्या डिग्रीसंदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर अजित पवार भाजपात जाणार अशी चर्चा सुरु झाली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनीदेखील अजित पवार भाजपात जाणार असा दावा केला. त्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. अजित पवारांना आठवलेंनी देखील पक्षात येण्याची ऑफर दिली. यावर आता अजित पवार काय उत्तर? देतील हे पाहणं महत्त्वाचं असेल.