एक्स्प्लोर

Ajit Pawar Baramati Plane Crash: अजितदादांची बारामतीत भीषण विमान अपघातात अकाली एक्झिट; 'उद्ध्वस्त' म्हणत एकाच शब्दात सुप्रिया सुळेंचा भावना अन् अश्रुंचा बांध फुटला

सुप्रिया सुळे यांनी व्हाट्सअप स्टेटसच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. 'Devastated' या एकाच शब्दात सुप्रिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतून बारामतीकडे प्रस्थान केलं आहे.

Ajit Pawar Baramati Plane Crash: गेल्या साडेचार दशकांपासून राज्याच्या राजकारणावर अविट छाप सोडलेले राज्याचे धुरंदर नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज (28 जानेवारी) बारामतीमध्ये भीषण विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्रामध्ये नेतृत्वाची पोकळी तयार झाल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांच्या धक्कादायक आणि अकाली एक्झिटनंतर उद्ध्वस्त या एका शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी व्हाट्सअप स्टेटसच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. 'Devastated' या एकाच शब्दात सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतून बारामतीकडे प्रस्थान केलं आहे. त्यांच्यासोबत खासदार सुनेत्रा पवार सुद्धा सोबत असल्याची माहिती आहे. 

अजित पवारांच्या अपघाताची बातमी येऊन धडकल्यानंतर राष्ट्रवादीसह अवघ्या महाराष्ट्रात सन्नाटा पसरला आहे. कार्यकर्त्यासह नेत्यांना सुद्धा अश्रु अनावर झाले. ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना अजित पवारांचे निधनाचे वृत समजताच त्यांना अश्रु अनावर झाले. त्यांना प्रतिक्रिया सुद्धा देता आली नाही. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाही आम्ही पोरके झालो म्हणत अश्रु अनावर झाले. 

अपघातस्थळ पाहून कार्यकर्त्यांचा आक्रोश (Ajit Pawar accident plane crash)

दरम्यान, आज अजित पवार यांचा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी बारामती दौरा होता. या दौऱ्यासाठी नेहमीप्रमाणे ते आज सकाळी बारामतीकडे विमानाने निघाले होते. बारामतीमध्ये लँडिंग करतानाच त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. यानंतर विमान जमीनदोस्त होऊन आग लागली. या आगीमध्ये विमानातील अजित पवारांसह पाच जणांचा वाचण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, अत्यंत गंभीर अवस्थेत त्यांना उपचारासाठी बारामतीमध्ये दाखल करण्यात आले, पण त्यांची प्राणज्योत मालवली. अजित पवार यांच्यासह विमानात पाच जण होते. अजित पवार यांच्यासह विमानात विदित जाधव (PSO to DyCM), पायलट सूमित कपूर, सांभवी पाठक (पायलट), आणि फ्लाईट असिस्टंट पिंकी माळी यांचा समावेश होता. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget