एक्स्प्लोर
कोल्हापुरात एसटीतून एअर गनसह कुकरी, छर्रे जप्त; उस्मानाबादचा एक जण ताब्यात
गगनबावडा इथे नाकाबंदीच्या वेळी पोलिसांनी पणजी ते महाबळेश्वर ही एसटी थांबवली. बसची तपासणी केल्यावर एक बॅग सापडली. या बॅगमध्ये एअरगन, दोन कुकरी, छर्ऱ्यांची डबी असं साहित्य सापडलं.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी सुरु आहे. नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी एका एसटी बसमध्ये एअर गन, कुकरी, छर्रे असं साहित्य जप्त केलं. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील वनविभागाच्या कार्यालयासमोर ही कारवाई झाली. याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यतल्या सालेगाव इथे राहणारा संघर्ष राजेंद्र भालेराव याला गगनबावडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जिल्ह्यात नाकाबंदी मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. गगनबावडा इथे नाकाबंदीच्या वेळी पोलिसांनी पणजी ते महाबळेश्वर ही एसटी थांबवली. बसची तपासणी केल्यावर एक बॅग सापडली. या बॅगमध्ये एअरगन, दोन कुकरी, छर्ऱ्यांची डबी असं साहित्य सापडलं. बॅगेबाबत चौकशी केली असता ती संघर्ष भालेराव नावाच्या व्यक्तीची असल्याचं समजलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याने ही हत्यारं कशासाठी आणि कुठून आणली? तो कुठे जात होता? याची चौकशी गगनबावडा पोलिस करत आहेत.
Before You Go
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















