देहविक्री करणाऱ्या महिलांनी आपल्या एक दिवसाची कमाई म्हणजे 21 हजार रुपये मदत म्हणून दिली. एकूण एक लाख रुपये जमा करुन देण्याचा संकल्प या महिलांनी केला आहे.
केरळमध्ये आतापर्यंत तीनशेपेक्षा जास्त नागरिकांनी आपला जीव गमावला, तर हजारो जण बेघर झाले. समाजाने उपेक्षित मानलं असलं तरी या महिलांनी माणुसकी दाखवत केरळच्या मदतकार्यात खारीचा वाटा उचलला आहे.
देहविक्रेत्या महिलांनी आपली एक दिवसाची कमाई म्हणून 21 हजार रुपयांचा धनादेश उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला. इतकंच नाही तर यापुढे एक लाख रुपये जमा करुन केरळवासियांना मदत म्हणून देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.
ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. त्यामुळे समाजाकडून दुखावलो जरी असलो तरी कर्तव्याची भावना मनात धरुन देहविक्री करणार्या महिलांनी केरळसाठी केलेली मदत इतरांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे, असंच म्हणावं लागेल.