Ahmednagar News update : अहमदनगरच्या दिशान गांधी याचा बास्केटबॉल सारख्या वैशिष्ट्यपूर्ण खेळात भारतीय संघात समावेश झालाय. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत दिशान खेळणार आहे. नुकत्याच थायलंड येथे झालेल्या आशिया-ओशनिया कॉर्फबॉल चॅम्पियनशिपमध्ये भारताने पाचवा क्रमांक मिळविलाय.  


कॉर्फबॉल या खेळात तब्बल 11 वर्षांनंतर भारतीय संघाने सहभाग घेतला आणि आशिया-ओशनिया कॉर्फबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारत पात्र ठरला. त्यातील पहिल्या आठ संघांतील प्रवेशामुळे भारताला प्रथमच जागतिक स्पर्धेची दारे खुली झाली आहेत. महिला आणि पुरुष या दोघांनाही या खेळात साखरेच महत्व असून महाराष्ट्रात हा खेळ तसा दुर्लक्षितच आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नगरच्या दिशानची निवड झाल्याने हा खेळ आता राज्यातही ओळखला जाणार आहे.


नुकत्याच झालेल्या स्पर्धेत भारतचे सामने ऑस्ट्रेलिया, थायलंड, जपान, मलेशिया, चीन तैपेई, न्यूझीलंड या संघांविरुद्ध झाले. दिशान हा महाराष्ट्रातर्फे एकमेव खेळाडू आहे, जो त्यांच्या गटातील सर्व सामने खेळला आहे. क्रिकेटमध्ये जसे फलंदाजासह गोलंदाजाला महत्त्व असते तसेच कॉर्फबॉलमध्ये गोल करणाऱ्या इतकेच महत्त्व गोल वाचवणाऱ्यालाही असते. दिशानने ऑफेन्सबरोबरच डिफेन्समध्येही चमकदार कामगिरी केल्याने त्याची निवड भारतीय संघात झाली आहे.  मात्र या खेळासाठी महाराष्ट्रात तशा पद्धतीचे मैदान नसल्याने ते उपलब्ध व्हावे अशी इच्छा दिशानचे वडील किशोर गांधी यांनी व्यक्त केलीय. यामुळे राज्यातील इतरही खेळाडू पुढे येऊ शकतात आणि देशासाठी खेळू शकतात असं किशोर गांधी यांनी म्हंटलंय.


कॉर्फबॉल हा खेळ जरी नवीन असला तरी त्यातही करिअर आहे. क्रिकेट आणि इतर खेळाबरोबर या खेळाला प्रोत्साहन मिळाले तर अनेक खेळाडू यात भाग घेतील. दिशानची निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात झाल्याने अभिमान वाटत असल्याचे दिशानची आई आणि बहिनेने सांगितलंय.
 
आजही ग्रामीण भागात मुली आणि महिलांना क्रीडा क्षेत्रात पाठवण्यासाठी पालक तयार होत नाहीत. मात्र हा खेळ असा आहे, ज्यात मुलांएवढेचे महत्व मुलींना आहे. चार पुरुष खेळाडू, चार महिला खेळाडू अशी या खेळातील खेळाडूंची संख्या आहे. या खेळाचे नियमही वेगळे आहेत. मात्र या खेळाबाबत ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य प्रशिक्षण दिले गेले तर एक वेगळी संधी खेळाडूंना मिळू शकते, असे क्रिडाप्रेमींचे म्हणणे आहे.