Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) बहुचर्चित बिपिन बाफना (Bipin Bafna) खून प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण झाली असून चेतन पगारे, अमन जट या दोघांना दोषी ठरविण्यात आले तर इतर तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्याचबरोबर येत्या गुरुवारी दोघांना सुनावली जाणार आहे. 


नाशिकमध्ये साडेनऊ वर्षांपूर्वी एक कोटीच्या खंडणीसाठी (Extortion) मुलाचे अपहरण (Kidnap) करून त्याची हत्या केल्याची घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. जवळपास साडेनऊ वर्षाच्या काळात सुरु असलेल्या गुन्ह्याचा खटला अंतिम टप्यात आला असून त्याची अंतिम सुनावणी होऊन या गुन्ह्यातील दोघांना दोषी ठरविण्यात आले असून तिघा संशयितांची न्यायालयाने मुक्तता केली. संशयित आरोपीना गुरुवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. 8 जून 2013 रोजी मयत विपीन गुलाबचंद बाफणा हा डान्स क्लासला जाऊन येतो असे सांगून गेल्यानंतर त्याचे अपहरण करीत अज्ञात व्यक्तीने विपिनच्या मोबाईलवरून गुलाबचंद बाफना यांना फोन करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली होती.


मात्र, पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने संतप्त झालेल्या संशयितांनी विपीन बाफना याची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती . पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास करून या हत्याकांडातील संशयित अमन जट, चेतन यशवंतराव पगारे, अक्षय उर्फ बाल्या सुरज सुळे, संजय रणधीर पवार, पम्मी भगवान चौधरी यांना अटक करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल केला होता. अपहरण करून हत्या करण्याबाबत दाखल असलेला खटला न्यायालयात साडेनऊ वर्ष चालला आहे. यामध्ये पोलीस अधिकारी, साक्षीदार आणि पंचांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. मंगळवार (दि. 13) रोजी नाशिकच्या न्यायालयात संशयित असलेले चेतन यशवंत पगारे, अमन प्रकट सिंग जट यांना न्यायालयाने दोषी ठरविले असून अक्षय सुळे, संजय पवार, पम्मी चौधरी यांना दोष मुक्त करण्यात आले आहे. यातील दोघा संशयितांना गुरुवार (दि.15) रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.


नाशिकच्या बहुचर्चित बिपिन बाफना खून प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण झाली असून चेतन पगारे, अमन जट  या दोघांना दोषी ठरविण्यात आले तर इतर तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बिपिन बाफना या मुलाचा 9 जून 2013 रोजी अपहरण करण्यात आले होते त्याचा 13 जून 2013 रोजी हत्या करणयात आली आली होती. तांत्रिक पुराव्याचा आधार घेत पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते, साडेनऊ वर्षानंतर या खून खटल्याचा निकाल लागला असून 35 साक्षीदार तपासण्यात आलेत, यातील प्रमुख दोन आरोपींना दोषी ठरविण्यात आलेत तर उर्वरित तिघांची  निर्दोष मुक्तता करण्यात आलीं आहे, आरोपींच्या शिक्षेवर  युक्तीवाद केला जाणार असून शिक्षा सुनावली जाणार आहे. अपहरण, खंडणी आणि खून असा तिहेरी गुन्हा घडल्यानं हे प्रकरण चांगलेच गाजले होते.


असा झाला होता उलगडा... 
दरम्यान 2013 साली झालेल्या बिपीन बाफना खून प्रकरणाचा उलगडा संशयितांच्या कॉल डिटेल्स वरून झाला. तपासादरम्यान पोलिसांना एका मोबाईल क्रमांकावर संशय आल्याने तपासचक्र गतिमान करत मोबाईल सिमकार्ड ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, त्याच्यापर्यंत पोलीस पोहचले. त्याची विचारपूस केली असता त्याने सिम त्याच्या नावावर आहे, मात्र वापर पंजाबच्या जालंधरस्थित त्याची मेव्हणी करत असल्याचे सांगितले. परंतु जेव्हा ती नाशिकला येते तेव्हाच ती मोबाईल वापरते. तोपर्यत हा सिम त्याचा चुलतभाऊ संशयित अमन प्रकटसिंग जट वापरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयित अमनला ताब्यातघेतल्यानंतर तो पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याची कसून चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली होती.