अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालय  आगप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चौघांना  पोलिसांनी अटक केली आहे. एक वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिका यांना पोलिसांनी अटक केली आहे.  6 नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयाच्या ICU विभागाला आग लागल्याने 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या गुन्ह्यात पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक केली आहे. यातील शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर शेख आणि आनंत यांचा सेवा समाप्ती करण्याचा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचा आदेश आहे. दरम्यान या अटकेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 


अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू (ICU) विभागाला भीषण आग लागली. या आगीत होरपळून आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला. कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर काळाने घाला घातला. शनिवारी सकाळी अचानक लागलेल्या आगीमध्ये अनेक रुग्ण होरपळले.  ऐन दिवळी घडलेल्या या भयावह घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे, असं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितलं. मात्र इमारत आणि वायरिंगही नवीन असताना इतक्यात शॉर्टसर्किट कसं झालं, इमारतीचं फायर ऑडिट झालं होतं की नाही, अग्नीरोधक यंत्रणा आहे की नाही, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. 


आगीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत : राजेश टोपे 


अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला राज्याकडून तातडीने 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीय. तर या दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी सांगितलंय.


Ahmednagar Hospital Fire : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात 11 कोरोनाबाधितांचा होरपळून मृत्यू, प्रशासनाकडून 5 लाखांची मदत जाहीर


कधी आग, कधी वायुगळती! कोरोना काळात रुग्णालयातील दुर्घटनांमध्ये राज्यात शेकडो निष्पापांचे बळी; जबाबदार कोण?