एक्स्प्लोर

मोटरमनचं प्रसंगावधान, गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसचा अपघात टळला

रात्री दीड वाजता खचलेला रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यात आला आणि तडे गेलेल्या रुळावर दुसरा पर्यायी रुळ टाकल्यानंतर गोवा एक्स्प्रेस रवाना झाली.

अहमदनगर : गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसच्या चालकाच्या प्रसंगावधानामुळे अहमदनगरमध्ये मोठा अनर्थ टळला आहे. श्रीगोंद्यात रेल्वेमार्ग खचल्यानंतर मोटरमनने वेळीच ट्रेनवर नियंत्रण मिळवल्यामुळे संभाव्य अपघात टळला. त्यानंतर या मार्गावर रेल्वेचा खोळंबा झाला आहे. श्रीगोंद्यात घारगावजवळ रेल्वे मार्ग खचल्यामुळे गोवा निजामुद्दीन एक्स्प्रेसचं इंजिन रुळाला घासलं. त्यामुळे रेल्वे रुळाला मोठा तडा गेला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत वेगावर नियंत्रण मिळवलं आणि मोठा अपघात टळला. गुरुवारी दुपारी साधारण साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रुळाला तडे गेल्याने क्रेनच्या सहाय्यानं इंजिन हटवण्यात आलं, तर रेल्वेच्या डब्यांना पाठीमागून इंजिन जोडून विसापूरला आणण्यात आलं. त्यामुळे दुपारी चार वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेक प्रवाशांची खाण्या-पिण्याची गैरसोय झाली. स्वच्छतागृहात पाणी टंचाई जाणवल्याचंही प्रवाशांनी सांगितलं. दरम्यान, कायदा सुव्यवस्था आणि लूटमार रोखण्यासाठी रेल्वेने सशस्त्र पोलिस तैनात केले होते. रात्री दीड वाजता खचलेला रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यात आला आणि तडे गेलेल्या रुळावर दुसरा पर्यायी रुळ टाकल्यानंतर गोवा एक्स्प्रेस रवाना झाली. घारगावच्या परिसरात रेल्वे मार्गावरील गेट बंद करुन बोगद्याचं काम सुरु आहे. या कामासाठी चार तासाचा ब्लॉक घेण्यात आला होता. काम झाल्यानंतर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, मात्र पटरीच्या खाली मातीचा भराव व्यवस्थित टाकण्यात आला नव्हता. त्यामुळे रेल्वे येताच वजनानं भराव खचला आणि रुळाला तडे गेले. शेजारीच बोगद्यासाठी तब्बल वीस ते तीस फुटांचा खड्डा खोदण्यात आला आहे. रेल्वेचा वेग कमी असल्यामुळे चालकानं त्वरीत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेमुळे मनमाड-दौंड मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. या मार्गावरील अनेक पॅसेंजर आणि एक्स्प्रेस गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या.

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Student Protest Pune: तुकाराम मुंढेंची एन्ट्री, भीमनवार सक्तीच्या रजेवर; MPSC विद्यार्थ्यांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य?, A टू Z माहिती
तुकाराम मुंढेंची एन्ट्री, भीमनवार सक्तीच्या रजेवर; MPSC विद्यार्थ्यांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य?, A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: अभिजीत दिपकेंनी वाहिली आजीला श्रद्धांजली, दोन दिवस हिंगोलीतच थांबणार
Maharashtra Live blog updates: अभिजीत दिपकेंनी वाहिली आजीला श्रद्धांजली, दोन दिवस हिंगोलीतच थांबणार
Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Embed widget