एक्स्प्लोर

अहमदनगर कथित ऑनर किलिंग घटनेला नवे वळण, मुलीला घरच्यांनी जाळलं नसल्याचं निष्पन्न

या प्रकरणी आता आता पोलिसांनी 169 प्रमाणे एक अहवाल पारनेर कोर्टात सादर केला आहे. आता पोलीस रुक्मिणीचा नवरा मंगेश रणसिंग याचा पोलीस घेणार जबाब आहेत. दरम्यान या प्रकरणी पकडलेल्या तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे.

अहमदनगर : अहमदनगरमधील पारनेरच्या निघोजमध्ये घडलेल्या कथित ऑनर किलिंग प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे. हे प्रकरण ऑनर किलिंगचं नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तशा संबंधीचा अहवालही पोलिसांनी तयार केला आहे. आंतरजातीय विवाह केल्याने वडिलांनी मुलगी रुक्मिणी आणि जावई मंगेश रणसिंग या दोघांना जाळल्याची माहिती समोर आली होती. यात मुलगी रुक्मिणीचा मृत्यू झाला तर जावई मंगेश हा जखमी झाला आहे. या प्रकरणी आता आता पोलिसांनी 169 प्रमाणे एक अहवाल पारनेर कोर्टात सादर केला आहे. आता पोलिस रुक्मिणीचा नवरा मंगेश रणसिंग याचा जबाब घेणार आहेत. दरम्यान या प्रकरणी पकडलेल्या तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. काय आहे प्रकरण? सुरुवातीच्या माहितीनुसार, अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील निघोजमध्ये आंतरजातीय विवाह केल्याने 1 मे रोजी मुलगी आणि जावयाच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटवलं होतं. या घटनेत मुलगी रुक्मिणी रणसिंगचा मृत्यू झाला होता. तर जावई मंगेश रणसिंग जखमी झाला होता. या दोघांचा सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. परंतु मुलीच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हतं. लग्नानंतर रुक्मिणी माहेरी राहायला आली होती. त्यावेळी मंगेश तिला भेटण्यासाठी तिथे आला होता. यावेळी रुक्मिणीचे वडील, काका आणि मामा यांनी मंगेशला बेदम मारहाण केली. त्यानंतर रुक्मिणी त्याच्यासोबत जाण्यासाठी निघाली असता, तिघांनी त्यांना एका खोलीत डांबलं आणि अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं. दोघांना उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु गंभीर भाजल्याने मुलीचा मृत्यू झाला होता तर जावयावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणीत पोलिसांनी मृत रुक्मिणीचे वडील, मुलीचे काका आणि मामा यांना अटक केली होती. मात्र आता हे ऑनर किलिंगचं प्रकरण नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. संबंधित बातम्या अहमदनगरमध्ये आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी आणि जावयाला पेटवलं अहमदनगर 'सैराट' हत्याकांड, मुलीसह जावयाला पेटवणाऱ्या नराधम बापाला अटक

महत्त्वाच्या बातम्या

चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
Embed widget