अहमदनगर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या अध्यक्षपदासाठी राजकीय रस्सीखेच जोरदार सुरु झाली आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक 23 जागा पटकावून काँग्रेसने प्रथम क्रमांक पटकावला, तर त्या खालोखाल राष्ट्रवादी 18 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.


काँग्रेस-राष्ट्रवादीचा आघाडीचा निर्णय झाला आहे. मात्र काँग्रेसमध्ये अध्यक्ष पदावरुन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्नी शालिनीताई विखे पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली. तर बाळासाहेब थोरात यांनी राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या सुनेसाठी. त्यामुळे अध्यक्षपदाचा वाद वरिष्ठ पातळीवर पोहोचला आहे.

काँग्रेसकडून बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राष्ट्रवादीतही उपाध्यक्ष पदावरुन घमासान सुरु आहे. या सर्व परिस्थितीवर भाजप लक्ष ठेवून आहे. काँग्रेसमध्ये अध्यक्ष पदावरुन एकमत न झाल्यास एका गटाला बरोबर घेऊन सत्तेचं स्वप्न गाठण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे अध्यक्षपद पटकावण्यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून वेगवेगळ्या तडजोडी होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर–( ७२ जागा )

  • भाजप–१४

  • शिवसेना–०७

  • कॉग्रेस–२३

  • राष्ट्रवादी–१८

  • इतर–१०


प्रमुख पक्ष–कॉग्रेस/राष्ट्रवादी