सीसीटीव्ही फुटेज पाहून जिल्हा पोलीस प्रमुखांनी पोलिसांची खातेनिहाय चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. ड्राय डेच्या दिवशी पोलिसांनी हॉटेलात जाऊन दारूची मागणी केली. त्यावेळी मॅनेजर अजित आणि राजू याना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
मारहाणीत जखमी झालेल्या मॅनेजरला कागवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी बेळगावला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस फुकट दारू, जेवण करतात आणि महिन्याला तीस हजार रुपये घेतात असा गंभीर आरोप हॉटेल मॅनेजरने केला आहे.
पाहा बातमीचा व्हिडीओ -