एक्स्प्लोर

राज्य सरकारचा ठोस निर्णय नाहीच, 154 पीएसआय मूळ पदावर

शपथ घेतलेल्या अनुसूचित जाती- जमातीतील 154 पोलीस उपनिरीक्षकांना आपलं पद गमवावं लागलं आहे. शपथ घेऊनही पद आणि प्रतिष्ठा गेली, 154 पीएसआय मूळ पदावर.

नाशिक: मॅटच्या आदेशांतर राज्य सरकारने ठोस निर्णय न घेतल्याने, शपथ घेतलेल्या अनुसूचित जाती- जमातीतील 154 पोलीस उपनिरीक्षकांना आपलं पद गमवावं लागलं आहे.  मॅटच्या आदेशांतर 154 प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांची नियुक्ती पुन्हा मूळ पदावर केली आहे. राज्य सरकारचा कायदा होत नाही तोपर्यंत भविष्य अंधारात असल्याने, 154 पीएसआयना आज पहाटेच नाशिकच्या प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पाठवण्यात आलं. 9 महिने पीएसआय या पदाचं प्रशिक्षण घेतलं, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शपथही घेतली. पण शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 154 पीएसआयच्या नियुक्तीवर मॅटने स्थगिती आणली आहे. मात्र मॅटच्या या स्थगितीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.  कारण सुप्रीम कोर्टाने बढतीतील आरक्षणाचा निर्णय संबंधित राज्यांवर सोपवला असताना, शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी 154 जणांची नियुक्ती मॅटने कशी रद्द केली असे प्रश्न विचारले जात आहेत. ही नियुक्ती आरक्षणातून बढती नव्हती तर खात्यांतर्गत सरळ सेवेतून एमपीएससी परीक्षा देऊन झालेली निवड होती, असा दावा नियुक्ती रद्द झालेल्या 154 जणांनी केला आहे. काय आहे प्रकरण? पदोन्नतीमधील आरक्षण बेकायदेशीर असल्याचं सांगत मॅटने राज्यातील 154 अनुसूचित जाती जमातीतील फौजदारांची नियुक्ती रोखली आहे. तसंच या सर्वांना त्यांच्या मूळ जागी नियुक्त करावं किंवा नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्याचा आदेशही मॅटने दिला आहे. या निर्णयामुळे प्रशिक्षण पूर्ण करुन नियुक्तीसाठी उत्सुक असलेल्या प्रशिक्षणार्थींमध्ये निराशा पसरली आहे. सरकारने 828 पोलीस उपनिरीक्षक अर्थात फौजदारांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ही भरती करण्यात आली. त्यानुसार निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी नाशिकमध्ये पाठवण्यात आलं. परंतु ही पदं भरताना पदोन्नतीमधील आरक्षण लागू केल्याचा दावा करत मंदार पाटील, संतोष राठोड, एम.एस. राडीये यांच्यासह सव्वाशे उमेदवारांनी मॅटमध्ये आव्हान दिलं होतं. या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप करतानाच, सरकारचा हा निर्णय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणारा असल्याचंही या उमेदवारांचं म्हणणं आहे. त्यांची ही भूमिका मान्य करत मॅटचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. एच. जोशी आणि सदस्य प्रविण दीक्षित यांनी सरकारी नोकरीत पदोन्नतीत आरक्षणाचा कायदाच नसताना, दिलेलं आरक्षण बेकायदेशीर असल्याचं सांगत 154 प्रशिक्षणार्थींना पोलिस उपनिरीक्षपदी देण्यात आलेल्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. मात्र खात्याअंतर्गत सरळसेवा पद्धतीने निवड होऊनही, आमची निवड पदोन्नतीने झाल्याचं परिपत्रक का काढलं? असा सवाल 154 उमेदवाराचा आहे.त्यामुळे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात तात्काळ पावलं उचलावीत, अशी विनंती या उमेदवारांनी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे नियुक्ती रद्द झालेल्या 154 जणांमध्ये प्रशिक्षणामध्ये  दुसरा आलेल्या उमेदवाराचाही समावेश आहे. कशी असते निवड प्रक्रिया? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलिस उपनिरीक्षक सेवाप्रवेश नियम 1995 मधील 3(ब) नुसार फौजदाराची निवड (by selection) 1995 पासून घेतल्या जातात. नियुक्तीसाठी 50% पदं ही एमपीएससीमार्फत सरळसेवा पद्धतीने, 25% पदं ही खात्याअंतर्गत सरळसेवा पद्धतीने (एमपीएससीमार्फत) आणि 25 % पदं सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीने (डीजी कार्यालयाकडून) भरली जातात. 'ही सरळसेवा परीक्षा, पदोन्नतीची नाही' दरम्यानच्या काळात मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेवर निर्णय देताना पदोन्नतीमधील आरक्षण रद्द ठरवलं. परंतु पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा ही खात्याअंतर्गत सरळसेवा स्पर्धा परीक्षा आहे. तरी देखील ही पदोन्नतीची परीक्षा असल्याबाबत परिपत्रक काढल्याचं 154 उमेदवारांनी सांगितलं. महाराष्ट्र सरकारच्या प्रत्येक विभागात पदोन्नती ही सेवाज्येष्ठतेनुसार दिली जाते. त्याचप्रमाणे पोलिस विभागात 'पोलिस शिपाई-पोलिस नाईक-पोलिस हवालदार-सहाय्यक पोलिस फौजदार' हा पदोन्नतीचा स्तर आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा परिणाम सेवाज्येष्ठतेनुसार असलेल्या पदोन्नतीवर होत असल्याने, त्याबाबत सरकारने पदोन्नती देण्यासंदर्भात मार्गदर्शनपर सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत दिलेल्या आदेशाचा परिणाम पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेवर होत नसल्याने, संबंधित परीक्षा ही पदोन्नतीच्या कक्षेत येत नाही, असा दावा या 154 जणांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शपथविधी विशेष म्हणजे 5 ऑक्टोबर रोजी या सर्वांनी नाशिकच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रात नऊ महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा शपथविधीही झाला. लवकरच ते फौजदारपदी रुजू होणार होते. मात्र त्यांना या पदावर नियुक्ती देऊ नये. तसंच या उमेदवारांना त्यांच्या मूळ पदावर नियुक्ती करायची की त्यांना अन्य दुसऱ्या ठिकाणी नियुक्त करायचे किंवा प्रतीक्षेत ठेवायचे याचा निर्णय घेण्याची राज्य सरकारला मुभा आहे. मात्र या उमेदवारांबाबत कोणताही निर्णय घेताना उच्च न्यायालयाच्या निर्णयाला बाधा पोहोचणार नाही याची दक्षता घ्यावी असं मॅटने आपल्या आदेशात म्हटलं आहे. तसंच या निर्णयामुळे रिक्त झालेल्या 154 जागांवर खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्याबाबतची यादी तसेच पदोन्नतीमधील आरक्षणाबाबतची आपली अंतिम भूमिका राज्य सराकरने 25 ऑक्टोबरपूर्वी स्पष्ट करावी असंही या आदेशात म्हटलं आहे. पदोन्नतीत आरक्षणाचा निर्णय राज्यांनी घ्यावा :  सुप्रीम कोर्ट बढतीमध्ये अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीच्या आरक्षणावर 2006 चा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. तसंच यावर पुन्हा विचार केला जाणार नाही, असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आरक्षणाच्या आधारावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण द्यायचं की नाही याचा निर्णय त्या-त्या राज्यांनी घ्यावा असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. संबंधित बातम्या

154 फौजदारांच्या नियुक्त्या रद्द, मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?   

 

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शपथविधी झालेल्या 154 पीएसआयच्या नियुक्त्यांवर गदा  

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Ujani Dam: उजनी AI डेटा सेंटर विरोधात सर्वपक्षीय रास्ता रोको; प्रशासनाने आंदोलनापूर्वीच 28 मुद्द्यांवर केला खुलासा; तर रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांची माहितीच खरी!
उजनी AI डेटा सेंटर विरोधात सर्वपक्षीय रास्ता रोको; प्रशासनाने आंदोलनापूर्वीच 28 मुद्द्यांवर केला खुलासा; तर रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांची माहितीच खरी!
Maharashtra Live blog updates: मोदी आणि संवैधानिक संस्थांवरील आरोपांविरोधात भाजपचा मोर्चा; फडणवीस, गडकरी सहभागी होणार
Maharashtra Live blog updates: मोदी आणि संवैधानिक संस्थांवरील आरोपांविरोधात भाजपचा मोर्चा; फडणवीस, गडकरी सहभागी होणार
High Court: High Court: फटाकेबंदीच्या अंमलबजावणीबाबत पोलीस गंभीर नाही; उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचं निरीक्षण; 15 दिवसांच्या कारवाईचा तपशीलही मागवला
High Court: फटाकेबंदीच्या अंमलबजावणीबाबत पोलीस गंभीर नाही; उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचं निरीक्षण; 15 दिवसांच्या कारवाईचा तपशीलही मागवला
Anil Deshmukh: 100 कोटी रुपयांच्या कथित आरोपांवर बोट, अनिल देशमुख यांचं राज्यपालांना स्मरणपत्र; न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनीक करण्याची मागणी
100 कोटी रुपयांच्या कथित आरोपांवर बोट, अनिल देशमुख यांचं राज्यपालांना स्मरणपत्र; न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनीक करण्याची मागणी

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Metro 4 Train Coach: वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये?
वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये?
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
Pimpri-Chinchwad Fire News: पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Pune Crime News: लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
Walmik Karad Beed : महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
Embed widget