एक्स्प्लोर
इमॅजिकामध्ये पर्यटक आणि सुरक्षा रक्षकात हाणामारी, दोन जण जखमी

रायगड: रायगडमधील अॅडलॅब इमॅजिका अम्युझमेंट पार्कमध्ये पर्यटक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये हाणामारी झाल्याचं वृत्त समोर येतं आहे. यामध्ये 2 जण जखमी झाले आहेत. पर्यटक महिला आणि सुरक्षा रक्षकांमध्ये काही कारणावरुन वाद झाला. या वादाचं पर्यवसान हाणामारीत झाल्याची माहिती मिळते आहे. यात एक पर्यटक आणि एक सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवार असल्यानं इमॅजिकामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते. रात्री आठच्या दरम्यान, या सर्व पर्यटकांना बाहेर येण्यास सांगितलं गेलं. पर्यटक जास्त असल्यानं बरीच गर्दी या ठिकाणी होती. त्यामुळे एका रांगेत सर्वांना बाहेर सोडण्यात येत होतं. यावेळी काही महिला पर्यटक दुसऱ्या रांगेत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यावेळी येथील एका सुरक्षा रक्षकानं त्यांना अडवलं. यावरुनच त्यांच्यात वाद झाला. यावेळी महिला पर्यटकांसोबत असणाऱ्या पुरुष पर्यटकांसोबत बराच वाद झाला. शेवटी याच वादाचं पर्यवसान हाणामारीत झालं. याप्रकरणी खालापूर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल (रविवारी) रात्री 8च्या सुमारास हा प्रकार घडला होता.
Before You Go
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















